शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विशेष संपादकीय : भंडारा अग्नितांडव - कोरडी सहानुभूती नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 07:15 IST

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही.

भंडारा अग्निकांडात बळी पडलेल्या बालकांच्या शोकव्याकूळ मातापित्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. त्या प्रसंगातील छायाचित्रात त्यांचा चेहरा का झाकण्यात आला, याबद्दलची भूमिका शेजारीच प्रकाशित करण्यात आली आहे. आजच्या अंकातही विरोधी पक्षनेत्यांसह विविध मंत्री व नेत्यांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. यामागचा नेमका हेतू अधिक स्पष्ट करणे गरजेचे आहे. भंडारा जिल्हा रूग्णालयातील आगीत बळी पडलेले कोवळे जीव हे सरकारी अनास्था व उदासीनतेचे केवळ एक उदाहरण आहे. असे अक्षम्य दुर्लक्ष सतत कुठे ना कुठे घडत असतेच. हे कधी थांबणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तेव्हा किमान लोकप्रतिनिधींनी तरी अशा दुर्घटना गंभीरतेने आणि अधिक संवेदनशीलतेने घ्याव्यात, यासाठी कोरड्या सहानुभूतीचे चेहरे प्रसिद्ध न करण्याची भूमिका नाईलाजाने 'लोकमत'ला घ्यावी लागली. 

लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही. आपत्ती अस्मानी असो वा सुलतानी, निष्पाप आणि निरपराधांना न्याय क्वचितच मिळतो. खरे गुन्हेगार कधीच पकडले जात नाहीत. लोक घटना विसरले की पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. भंडारा अग्निकांडाबाबतही दुर्दैवाने असेच घडत आहे. आता बास्स! लोकांना या प्रकाराचा वैताग आला आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. ‘पत्रकारिता परमो धर्मः’ या न्यायाने समाजाच्या या भावनांची थेट दखल घेणे, जनतेच्या सात्त्विक संतापाला वाट मोकळी करून देणे 'लोकमत'चे कर्तव्य आहे. व्यापक लोकभावनेतून घेतलेली ही भूमिका कोणताही राजकीय पक्ष वा विशिष्ट नेत्यांच्या विरोधात किंवा बाजूने नाही. लोकप्रतिनिधींनी जनतेशी बांधिलकी जपावी, प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने कार्यरत व्हावे, व्यवस्थेत सुधारणा घडावी, सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण व्हावे, हा स्पष्ट उद्देश या भूमिकेमागे आहे.     - समूह संपादक

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगUddhav Thackerayउद्धव ठाकरे