शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ‘लाभार्थी’ अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:55 IST

ज्या गतीने कामे सुरू आहेत, ते पाहता खड्डेमुक्ती स्वप्नवत राहील़ प्रवासी असो की शेतकरी लाभार्थी मराठवाड्यात तो कायम अडचणीतच आहे.

ज्या गतीने कामे सुरू आहेत, ते पाहता खड्डेमुक्ती स्वप्नवत राहील़ प्रवासी असो की शेतकरी लाभार्थी मराठवाड्यात तो कायम अडचणीतच आहे.होय मी लाभार्थी. हे माझं सरकाऱ़़ या जाहिरातीवरून सध्या राजकारण सुरू आहे़ विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार उत्तर दिले आहे. आधी सत्ताधारी लाभार्थी होते, आता सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभ पोहचला, हा प्रतिसाद पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे, हा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे.नक्कीच जलयुक्त शिवारची कामे झाली़ काही प्रयोगशील अधिका-यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात बदल घडविला़ काही गावे डासमुक्त झाली़ स्वच्छता मोहिमेत जागरुकपणे पुढे आली़ शाळा डिजिटल झाल्या़ शोषखड्ड्यांच्या यशस्वी प्रयोगाने मराठवाड्यातील काही ठिकाणी पाणीपातळी वाढल्याची उदाहरणे समोर आली़ परंतु हा बदल अपवाद होता़ तो सार्वत्रिक होऊ शकला नाही़ जलयुक्त शिवारमध्ये परिणाम साधल्याची उदाहरणे जशी आहेत तशी त्याची दुसरी बाजूही आहे़ लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये शौचालय बांधकामाची कामे गतीने झाली़, परंतु तितक्या गतीने लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोहचले नाही़ शौचालय बांधकाम, प्रत्यक्ष त्याचा वापर हा प्रबोधनाचा विषय असला तरी योजनांसाठी विनाविलंब निधीची तरतूद करणे हे सरकारी यंत्रणेचे काम आहे़ आधी बांधलेल्या शौचालयांचेच अनुदान आले नाही म्हणून पुढची कामे रेंगाळली़ सरकार कोणतेही असो भ्रष्टाचार जसा अविभाज्य भाग आहे तसे योजना कोणतीही असो मराठवाड्याच्या वाटेला उशिराने तरतूद हे ठरलेले आहे़मराठवाडा, विदर्भ हे मागास विभाग आहेत़ त्यात विदर्भाच्या वाट्याला झुकते माप मिळत असेल तर त्यात वावगे काही नाही़ परंतु गेल्या तीन वर्षातील निधीच्या तरतुदीचे अन् योजनांचे आकडे तपासले तर मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचे दिसते़ त्यात एखाद्या खात्याचे उदाहरणही पुरेसे आहे़ सध्या राज्यात खड्डे बुजविण्याची मोहीम धुमधडाक्यात सुरू आहे़ साधारणपणे राज्यातील एकूण ९० हजार किलोमीटर रस्त्यांपैकी १५ हजार किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आले आहेत़ त्या रस्त्यांचे अन् त्यावरून जाणाºयांचे भाग्य पुढच्या दोन वर्षात उजळेल अशी अपेक्षा आहे़ उर्वरित ७५ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी २५ हजार किलोमीटर रस्ते खड्ड्यांचे तर २५ हजार किलोमीटर रस्ते जवळजवळ उद्ध्वस्त असल्याच्या स्थितीत आहेत़ त्यात सर्वाधिक भाग मराठवाड्याचा आहे़ परिणामी, नव्याने रस्ता बांधणी हा एकमेव पर्याय आहे़ त्यामुळे खड्डे बुजविण्याची मलमपट्टी व्यर्थ ठरणार आहे़ नक्कीच १६ डिसेंबरला मराठवाड्याचा दौरा केला तर हजारो खड्डे जैसे थे दिसतील अशीच कामाची कासवगती आहे़ विरोधकांच्याच नव्हे, सत्ताधारी आमदारांच्या नव्हे तर मंत्र्यांच्या मतदारसंघात खड्डेमुक्ती झाली तरी समाधान होईल़कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरूनही निर्माण झालेला असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या १५ दिवसांत केला़ काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात झाले़ याकडे विरोधक राजकारण करीत आहेत, एवढा मर्यादित कटाक्ष टाकून सत्ताधाºयांना बाजूला होता येणार नाही़ होय हे माझं सरकार हे पुढच्या दोन वर्षांत सिद्ध करावे लागेल़ पडताळणीच्या कचाट्यात अडकलेली कर्जमाफी लाभार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे़ पात्र यादी बँकांपर्यंत पोहचूनही मराठवाड्यात बहुतांश शेतकºयांची प्रत्यक्ष कर्जमाफी झालेली नाही़- धर्मराज हल्लाळे dharmraj.hallale@lokmat.com

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार