शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - वर्तुळाकार ब्रह्मांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:33 IST

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार

जेव्हा आपण ब्रह्मांडातील हालचालींचे सूक्ष्मपणे अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला समजते की ब्रह्मांडातील सर्व हालचाली या गोलाकार असतात व त्या हालचाली पुन्हा पुन्हा घडतात. ब्रह्मांडाचे सर्व पिंड गोलाकार रूपात फिरत असतात आणि त्याची जी लयबद्धता आहे, तीसुद्धा पुन्हा पुन्हा घडते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते ब्रह्मांडात विनाश व निर्मितीची प्रक्रि या सतत सुरू आहे. ही प्रक्रिया अनंतकाळापासून अविरत व अखंडितपणे सुरू आहे. जेव्हा आपण मानवी जीवनाच्या कार्याकडे पाहतो, त्यावेळी कळते की ही गोलाकार प्रक्रिया आपल्या जीवनात नेहमीच घडत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व प्रक्रि या पुन्हा पुन्हा घडत असतात. सकाळी उठल्यावर दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे, व्यायाम करणे, जलपान करणे, काम करणे, खेळणे, रात्रीला जलपान, रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोपणे. या सर्व क्रिया सतत घडत असतात. असे वाटते की, संपूर्ण ब्रह्मांडाचे जीवन चक्र ाकार आहे, जे सतत फिरत असते. या सृष्टीतील द्वंद्वचा सिद्धांतसुद्धा या गोष्टी उघड करतो. द्वंद्वच्या सिद्धांतानुसार दोन विपरीत शक्ती सतत कार्यरत असतात व विपरीत असतानाही एकमेकांना पूरक असतात. जसे अंधारानंतर प्रकाश व प्रकाशानंतर अंधार असतो. जन्मानंतर मृत्यूचे येणे सुनिश्चित आहे. ऊर्जेच्या नियमानुसार ऊर्जा कधीच नाश पावत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते. म्हणजेच मृत्यूनंतरही ऊर्जास्वरूप अस्तित्व राहतेच व अनेक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माची खूप मोठी संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार या सृष्टीला केवळ आविर्भाव व तिरोभाव असतो. अर्थातच सृष्टी निर्माणही होत नाही व नष्टही होत नाही. ती केवळ प्रकट होत असते व लुप्त होत असते. भारतीय शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की सृष्टीचा आविर्भाव म्हणजे ब्रह्मदेवाचे श्वास सोडणे व तिरोभाव म्हणजे श्वास आत घेणे. या संबंधी एक दुसरे उदाहरण दिले जाते, ज्यात असे म्हणतात की, कातिन जाळ्याला विणते व उलगडते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव या सृष्टीला प्रकट व नष्ट करतात. भारतवर्षात या तत्त्वज्ञांनी संकल्पना हळूहळू वैज्ञानिक आधारसुद्धा घेत आहेत. विज्ञानाचे म्हणणे आहे की ऊर्जा जेव्हा घनस्वरूपात असते तेव्हा पदार्थाचे रूप धारण करते व पदार्थ जेव्हा विरघळतो तेव्हा तो ऊर्जेचे रूप धारण करतो. म्हणजेच पदार्थ व ऊर्जा एकच आहेत. ते चक्राकार रूपात एकमेकांना बदलत असतात.- डॉ. भूषणकुमार उपाध्याय -