शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वैधानिक विचार देणारे बाबासाहेब

By admin | Updated: April 14, 2016 02:42 IST

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम

- अ‍ॅड. असीम सरोदे

भारतामध्ये शिक्षणाबाबत जागृती येत असतानाच्या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय झाला. शिक्षणाने समृद्ध होणे म्हणजे काय व शिक्षणातून आलेल्या सज्ञानतेचा वापर कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वत:च्या जीवन प्रगतीमधून घालून दिले. आता प्रश्न इतकाच की, न शिकता किंवा शिक्षणाचे मूल्य समजून न घेता आंबेडकरांच्या नावाने संघटित झालेल्या आणि संघर्र्ष करीत असलेल्या संघटना व चळवळींनी बाबासाहेबांंचे विचार समजून घेतलेत का? त्यांच्या नावाने सत्तास्थानी जाऊन बसलेल्या काही नेत्यांच्या अस्तित्वाचेही विश्लेषण झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी अनेक हाल सहन केले. पण संविधान लिहिताना त्यांच्या मनातील राग, चीड व दाहकता व्यक्त झाली नाही. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव सातत्याने समाजावर राहणे नैसर्गिक आहे. पण मानवी हक्कांचा व्यापक कैवार घेतलेल्या बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून कैद करून ठेवण्याच्या प्रक्रियेला छेद दिला पाहिजे. बाबासाहेबांना ‘माणूस’ म्हणून समजून घेतले तर कुणी हेलिकॉप्टरमधून त्यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा, रूचीहीन गाणे व अंगविक्षेपपूर्ण नाच करीत मिरवणुका काढण्याचा नाठाळपणा करणार नाही. न्याय म्हणजे काय, याचा विचार अगदी न्यायव्यवस्थेच्या इतिहासापासून होत आला आहे. वैविध्यपूण भारताचे संविधान लिहिताना सर्वांना वैधानिक विचारांमध्ये बांधण्याचे मोठे काम त्यांनी केले. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांच्यामार्फत राज्ययंत्रणा चालविणारी तत्त्वप्रणाली देतानाच न्याय व्यक्तिसापेक्ष नसेल ही भूमिका त्यांनी मांडली. घटनात्मक चौकटीत ‘सकारात्मक भेदभाव’ (पॉझिटिव्ह डिस्क्रीमिनेशन) मान्य करून त्याचवेळी समाजातील वंचित व कमजोर वर्गाला समानतेच्या पातळीवर येण्यासाठी संधीची समानता त्यांनी निर्माण केली.