शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Atal Bihari Vajpayee : टूट सकते है मगर हम झुक नही सकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 03:46 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते.

- राजेंद्र दर्डाएडिटर इन चीफ, लोकमत समूहपत्रकार, प्रखर वक्ता, संवेदनशील कवी ते पंतप्रधान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अटलबिहारी वाजपेयीजी यांनी जागतिक राजकारणावर अमीट ठसा उमटवला. वाजपेयी नावाच्या झंझावातासोबत विदेश दौरा करण्याचे भाग्य मला १९९९ मध्ये जी-१५ परिषदेच्या निमित्ताने लाभले. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान त्रिनिदाद-टोबॅगो, जमैका, मोरोक्को या देशांच्या भेटीत मी त्यांच्यासोबत होतो. त्यांची उभी हयात आणि एकूण राजकीय कारकीर्द खरोखरच सर्वांसाठी आदर्श ठरावी. भारतीय जनसंघाचे खासदार ते विविध विरोधी पक्षांची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मोट बांधणारे तीनवेळा पंतप्रधान हा प्रवास वाजपेयींनी स्वकर्तृत्वाने यशस्वी केला. त्यांनी शेवटपर्यंत संसदेत आपला दबदबा कायम ठेवला.विदेश दौºयात वाजपेयीजी यांच्यातील अनेक पैलू मला पाहता आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. पोर्ट आॅफ स्पेन (त्रिनिदाद) येथे महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राची वाजपेयी यांनी पायाभरणी केली. महात्मा गांधींचा जन्म भारतात झाला असला तरी ते साºया जगाचे होते आणि वसुधैव कुटुंबकम या वैदिक स्वप्नांचे साक्षात रूप बनले होते, अशी भावना वाजपेयीजी यांनी व्यक्त केली होती. भारतात त्यावेळी ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमके पोर्ट आॅफ स्पेनचे व्यासपीठ त्यांनी निवडले होते. कारण भारताप्रमाणे त्रिनिदाद हाही एक बहुधार्मिक देश आहे. त्यावेळी त्रिनिदाद व टोबॅगोची निम्मी लोकसंख्या भारतीय वंशाची होती आणि वासुदेव पांडे हे त्या देशाचे पंतप्रधान होते. यावेळी अटलजींमधील ठाम नेतृत्वाची झलक बघावयास मिळाली.त्रिनिदादला पोहोचण्यासाठी तब्बल २० तासांची रात्र आणि १५ हजार कि.मी.चा प्रवास आम्ही अनुभवला. दिल्लीहून एअर इंडियाचे विशेष विमान आकाशात झेपावले तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मध्ये इंधन घेण्यासाठी पोर्तुगालची राजधानी लिसबान येथे काही काळासाठी विमान उतरले होते. त्यानंतर त्रिनिदादला पोहोचेपर्यंत अशी एकूण २० तासांची रात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवली.अटलजींच्या या दौºयात भारतातील आम्ही एकूण १३ पत्रकार होतो. विमानात अटलजींनी मला भेटायला बोलावले. मी मराठी वृत्तपत्र लोकमतचा मुख्य संपादक अशी ओळख करताच अटलजी म्हणाले, दर्डाजी मुझे लोकमत के बारे मे मालूम हैै. वैसे आपके अखबार के विचार और हमारे विचार अलग हैै. लेकिन आपका अखबार अच्छा काम कर रहा हैै. आपल्या विचारांशी ज्याची नाळ जुळत नाही, त्यांचाही कसा आदर सन्मान करावा, हा उदारवाद मला अटलजींमध्ये बघावयास मिळाला.इकडे आम्ही विदेशात असताना मागे देशात राजकीय घटनाक्रम वेगाने वेगवेगळे वळण घेत आहे, त्याचा अंत केंद्रातील सरकार पडण्यानेही होऊ शकतो, याचा किंचितही तणाव वाजपेयींच्या चेहºयावर कधीही जाणवला नाही किंवा विचलित दिसले नाहीत. सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा देणारे ओमप्रकाश चौटाला यांना दूरध्वनी करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास त्यांनी याच दौºयात संमती दिली होती. या दौºयावरून परतल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी १६ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने कोसळले. त्या एका मताची खंत आजही सर्वांच्या स्मरणात आहे.दांव पर सब कुछ लगा है, रुक नही सकतेटूट सकते है मगर हम झुक नही सकतेअसे सांगणारे कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. भारतीय जनता पार्टीतील एक उदारमतवादी नेता, पक्ष व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खंबीर बाण्याच्या या आदर्श नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली ! 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान