शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:28 IST

आमच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी नाही; पण मी नगरसेवक झालो तेव्हा घरच्यांना खूप आनंद झाला.

संदीप देशपांडे, मनसे नेते

राजकारणाला साधारण १९९१ पासून म्हणजे जेव्हा रूपारेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हापासून सुरुवात केली. त्यावेळी कॉलेजमध्ये निवडणुका होत असत. मी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकलोही. तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेत होतो. १९९८ पर्यंत हे कॉलेज राजकारण सुरू होते. त्यानंतर तिकडचे लक्ष कमी करून मी व्यवसायाकडे लक्ष दिले, ते २००६ पर्यंत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा मी माझ्या व्यावसायिक पार्टनरला म्हणालो की, मला राजकारणासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि जमेल तसं व्यवसायात लक्ष देईन. त्यालाही माहीत होते की मला राजकारणात रस आहे. तेव्हा तो मला म्हणाला की, तू पाच वर्षे राजकारणात राहून बघ. पाच वर्षे मी घरी पैसे पाठवेन, तू पूर्णवेळ राजकारण कर. त्यातूनही वाटले की तुला राजकारणात राहायचे आहे तर पुढे सुरू ठेव, नाहीतर आपला व्यवसाय आहेच. पुढे मी नगरसेवक झालो आणि सध्या राजकारणात पूर्णवेळ सक्रिय आहे; त्या माझ्या पार्टनरने आणि बायकोने मला जो आत्मविश्वास दिला तो महत्त्वाचा होता. आई-वडिलांना थोडी भीती वाटत होती. कारण, आमच्या घरात राजकारणाची काहीच पार्श्वभूमी नाही; पण नंतर मी नगरसेवक झालो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.

बायकोच घेते निर्णय

घरातले सगळे निर्णय बायकोच घेते. कधी तिला वाटलं तर ती मला विचारते. तिचा चॉईसही बरोबर असतो असं वाटतं. कारण ज्या अर्थी माझ्याशी लग्न केलं त्या अर्थी तिचा चॉईस चांगलाच आहे. तिला निर्णयाची पूर्ण मुभा आहे. मी राजकारणात असल्यामुळे मला तेवढा वेळही देता येत नाही. आमच्याकडे गणपती येतात. गणपतीची मूर्ती कशी असावी, याचाही निर्णय तीच घेते, तिला त्यातलं जास्त कळतं. याशिवाय मुलाची शाळा, ट्यूशन असे घरातले सगळे निर्णय बायकोचेच असतात.

नॉर्थ-ईस्ट फिरायचा राहिला आहे

फिरायला मला खूप आवडतं आणि तो निर्णय मात्र माझा असतो. त्यात माझ्या बायकोला फार रस नसतो. भारताबरोबरच परदेशातही फिरलो. व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण भारत फिरून झाला आहे; पण नॉर्थ-ईस्ट फिरायचं बाकी आहे. २०३५ पर्यंत राजकारण करायचं, तोपर्यंत मी राजकारणात यशस्वी असेन किंवा नसेन पण त्यानंतर जे देश फिरायचे राहिलेत ते फिरायचे, असं आज तरी पक्कं केलं आहे. कारण, तुम्हाला आयुष्य एकदाच मिळतं आणि त्यातच सगळ्या गोष्टी करायच्या. एकाच गोष्टीच्या मागे आपण किती लागायचं?

मुलाचा जन्म सर्वात आनंदाचा क्षण

माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे मला मुलगा झाला तो. कारण खूप उशिराने मला मुलगा झाला. तो दिवस आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे.

जीन्स-टी-शर्ट आवडते

कपड्यांचा मी शौकीन आहेच; पण माझ्याकडे ब्रँड लॉयल्टी नाही. जे आवडेल ते, मग ते रस्त्यावर मिळाले तरी चालते. खूप फॉर्मल मला नाही आवडत, जीन्स-टी-शर्ट आवडतो. कारण, त्यात मला खूप कम्फर्टनेस जाणवतो. अनेकदा बायकोही माझ्यासाठी कपडे खरेदी करते.

मुलासोबत चित्रपट पाहतो

कुटुंबासोबत शेवटचा चित्रपट पाहिला तो छावा. आता ‘गुलकंद’ बघायचा आहे. मी माझ्या मुलासोबत अनेकदा दुपारच्या वेळेत चित्रपट पाहायला जातो. बायको काही वेळा ऑफिस कामात व्यग्र असते. तेव्हा आम्ही दोघे जातो. त्याला आवडणारे चित्रपट मलाही आवडतात, जसे की अवेंजर्स, थंडरबॉल.

शब्दांकन : सुजित महामुलकर

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेPoliticsराजकारणtourismपर्यटन