शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बुद्धी मिळाली, आता सुबुद्धी यावी...

By किरण अग्रवाल | Updated: September 3, 2020 09:37 IST

यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले.

किरण अग्रवालकोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता सुरक्षितपणे घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याची बुद्धी यंदा श्री गणरायाने दिल्याने सर्वच ठिकाणच्या नद्यांमध्ये यानिमित्त होणारे प्रदूषण बरेचसे टळले; पण ही केवळ यंदाची किंवा याच कारणापुरतीची प्रासंगिकता न ठरता आता या विचाराचा धागा पुढे नेत यापुढेही अशीच काळजी घेतली गेली तर नद्यांची निर्मळता तर टिकून राहीलच शिवाय पर्यावरणालाही मोठा हातभार लाभून जाईल.यंदा कोरोनामुळे चिंतेची स्थिती असताना गणरायाचे आगमन झाले; पण या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वच ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली गेल्याचे दिसून आले. गणरायांच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवरील बंदी तसेच मूर्तीच्या उंचीबाबतचे निर्देश शासन पातळीवरून देण्यापूर्वीच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचे निर्णय घेतलेले दिसून आले हे यात विशेष. मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटी व राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठी आदराचे व श्रद्धेचे स्थान. तेथे दर्शनासाठी उसळणारी गर्दी हीदेखील उत्सुकतेचा विषय ठरत असते; परंतु यंदा या मंडळानेही मूर्तीच स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो, की अन्य मानाची गणेश मंडळे; त्यांनीही नेहमीची भव्यदिव्य आरास व गर्दी टाळण्याबरोबरच सामाजिक सेवेच्या उपक्रमांवर भर दिला. एरव्ही दोन दोन दिवस चालणारी पुण्यातील विसर्जनाची मिरवणूक यंदा काढलीच गेली नाही. मुंबई, पुण्याप्रमाणेच राज्यातील नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा सर्वच शहरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी याबाबत गर्दी टाळून सुरक्षितता जपण्यावर भर दिल्याचे बघावयास मिळाले. एक प्रकारे कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यपूरक गणेशोत्सव साजरा केला गेलेला दिसून आला.महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी परंपरेप्रमाणे मुंबईत समुद्रात व अन्य ठिकाणी नद्यांमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता सामाजिक संघटनांकडून मूर्ती दानाचे उपक्रम राबविले जात असतात. नद्यांमधील विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी या नदी काठांवर उभे राहून नदीतले चित्र बघणे हे सश्रद्ध मनाला मानवणारे नसते. नाशकातील गोदावरी व धुळ्यातील पांझराकान सारख्या नद्या तर शहराच्या मध्य भागातून गेलेल्या असल्याने तेथे तर धूम असते; पण कोल्हापुरातील पंचगंगा असो, की नाशिक ते नांदेडपर्यंतची गोदा, पंढरपूर- सोलापूरचा भीमाकाठ असो, की नागपुरातील तेलंखडी किंवा शुक्रवारी तलाव; सर्वत्र सारखेच चित्र दिसायचे. मात्र अलीकडे मूर्ती दान किंवा संकलन मोहिमांना चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यंदा सार्वजनिक मंडळांबरोबरच सोसायट्या व घराघरातील बाप्पांचेही घरच्या घरीच विसर्जन केले गेले त्यामुळे त्यांचीही नदी, तलावांवर होणारी गर्दी टळली. परिणामी त्यांची निर्मळताही बºयापैकी टिकून राहिलेली दिसून आली. म्हणजे आरोग्यपूरकतेला पर्यावरणपूरकतेचीही जोड लाभली.अर्थात, बुद्धीची देवता म्हणवणाºया बाप्पांनीच कोरोनापासून बचावासाठी ही बुद्धी दिली म्हणायचे. आज कोरोनाशी संबंधित भयातून जी बुद्धी वापरली गेली, ती यापुढील काळातही शाबुत राहिली तर पर्यावरणास मोठाच हातभार लाभू शकेल. बाप्पांच्या विसर्जनाच्या संदर्भातच नव्हे तर अन्यही कारणातून होणारे नद्यांचे प्रदूषण टाळले जाणे गरजेचे बनले आहे. पाणीवाले बाबा म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉ. राजेन्द्र सिंह व अन्यही अनेक पर्यावरणप्रेमी यासाठी परिश्रम घेत आहेत. जागोजागी नमामि गंगा, नमामि गोदा, नमामि चंद्रभागा यासारख्या मोहिमा सुरू झाल्या आहेतच. शिवाय गणेशोत्सवाचे स्वरूप अलीकडील काही वर्षात खूप बदलले आहे, तेव्हा सामाजिक भान राखत यंदा ज्या पद्धतीने आरोग्यविषयक व मदतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले, तसे यापुढील काळातही घडून येण्यासाठी बाप्पांनीच सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा करूया. आगामी काळ हा ऑनलाइन शिक्षणाचा राहणार आहे; परंतु ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अशी आहेत जी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक ते मोबाइल किंवा टॅब घेण्याच्या आर्थिक स्थितीत नाहीत, अशांना सार्वजनिक गणेश मंडळांकडून मदत मिळू शकली तर ख-या अर्थाने बाप्पांनाही आनंदच होईल इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण