शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना पुरुष खेळाडूंचे कौतुक, महिला खेळाडूंचा मात्र तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 08:41 IST

विंटर ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचे कौतुक करताना ट्रम्प यांची खोचक टिप्पणी संतापाचे कारण ठरली आहे.

-प्राजक्ता पाडगांवकर (भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक, अटलांटा)मिलानो कॉर्टिना येथे विंटर ऑलिम्पिक नुकतेच पार पडले. त्यात अमेरिकन संघाला तब्बल ३३ पदके मिळाली, यात २१ पदके महिला खेळाडूंनी मिळवली. १२ सुवर्णपदकांपैकी ८ महिलांना मिळाली. अमेरिकेच्या या घवघवीत यशानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन आइस हॉकीच्या पुरुषांच्या विजेत्या संघाला काही तासांत फोन करून अभिनंदन केले. या संभाषणादरम्यान ते खोचकपणे म्हणाले, 'आता महिला संघालादेखील पाचारण करावे लागेल व्हाइट हाऊसच्या पार्टीसाठी, अन्यथा मला इम्पीच करतील.' - यावर लॉकररूममध्ये एकच हशा पिकला. तिथले विजेते पुरुष खेळाडूही या हलक्या विनोदावर हसले, कारण तो देशाच्या प्रमुख नेत्याने केलेला विनोद होता.

यंदाच्या ऑलिम्पिकच्या देदीप्यमान यशात स्त्रियांचा नुसता वाटा नसून, संपूर्ण यशाची पायाभरणी त्यांची. मानवीय क्षमतांची अतिउच्च स्तरावर होणारी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन महिला संघाने हॉकीचा सामना ७-० असा जिंकला. ज्या देशाचे नाव त्यांनी मोठे केले, त्या देशाच्या नेतृत्वाने मात्र त्यांच्या यशाची खिल्ली उडवली, उत्तरादाखल महिला संघाने व्हाइट हाऊसचे निमंत्रण नाकारले.

देशात सुरू असलेली स्थलांतरितांची गळचेपी, एपस्टीन फाइल्सचा गदारोळ, अशा पार्श्वभूमीवर अमेरिकन खेळाडू इटलीला पोहोचले, तिथे उपराष्ट्रपती व्हॅन्स यांना धिक्कारण्यात आलेले असताना, देशासाठी जीव तोडून खेळणे अजिबात सोपे नव्हते. तरीही, खेळाडूंनी, विशेषतः महिलांनी, अमेरिकेसाठी पदकांची रास लावली, देशाचा मान राखला, त्यांना घरचा आहेर मिळाला तो हा असा!

खेळाडूंनी खेळासाठी खेळावे, इतर राजकीय गोष्टीत पडू नये, असे अनाहूत सल्लेदेखील पुष्कळ मिळाले, तरी अनेक खेळाडूंनी स्वतःची मते निर्भीडपणे मांडली. ख्रिस लिलीस याने खंत व्यक्त केली, देशात सुरू असलेल्या प्रकाराबाबत. हंटर हेस याने देशाचे ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व करतेवेळी मनात संभ्रम असल्याचे बोलून दाखवले. 

फिगर स्केटर आम्बर ग्लेन हिने LGBTQ घटकांवर अमेरिकेत सुरू झालेल्या अत्याचारांवर भाष्य केले. मिकेला शिफरीन हिने नेल्सन मंडेला यांचे शांतता, समभाव याबद्दलचे विचार मांडले. फिगर स्केटर आलीस लिऊ हिचे सहज वावरणे, जिंकल्यावर मनमुराद आनंद व्यक्त करणे, तिचे वडील चायनीज वंशाचे असणे, या सगळ्याच बाबत सध्याचे सरकार नाराज झाले आहे. 

ऑलिम्पिक माणसातील उच्चतम गुणांची स्पर्धा असते. जिथे देशप्रेम आले, देशाभिमानासाठी पराकोटीचे झटणे आले, तिथे त्या देशातील सद्यःस्थितीबाबत मते खेळाडूंना निश्चित असणार. जिंकल्यावर ज्या देशाचा झेंडा फडवणार, त्याबाबत अभिमान तर वाटायला हवा ! अशाअर्थी ऑलिम्पिक सदासर्वकाळ राजकीय होते, आहे आणि राहणार. 

अमेरिका म्हणजे उदात्त, स्वतंत्र, भेदांपलीकडे, माणसांतील सर्वश्रेष्ठत्व साजरा करणारा मुक्त देश, अशी अनेक वर्षे असलेली महती. अभिमानाने अमेरिकन झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरवणे सवयीचे असलेल्या खेळाडूंना गेली काही वर्षे खरोखर कसोटीची ठरत आहेत. 

निवृत्त खेळाडू मेगन रपिनो, २०२० च्या एका मुलाखती दरम्यान म्हणाली, 'देशाभिमान म्हणजे तरी काय, तर सतत स्वतःला देशासाठी उत्तम सिद्ध करत राहणे.' खेळाडू हेच तर करत असतात, म्हणूनच सर्व खेळाडूंना भेदांपलीकडे कौतुक, मान सन्मान मिळायला हवा; पण हे सध्याचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांच्या गावीही नाही !praj.padgaonkar@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Praises Male Athletes, Disdains Women: A Critical View

Web Summary : Trump favored male Olympians, slighting women's achievements despite their medal haul. Athletes, particularly women, faced political pressures, yet excelled. Criticism followed Trump's dismissive remarks, highlighting a divide between athletes' values and the administration's stance. Some athletes openly criticized the political climate.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष