शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लेख: स्टेशनबाहेरच बदलून घ्या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 08:14 IST

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

महेश कोले, प्रतिनिधी: शाश्वत विकास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काही निवडक स्थानकांपुरती मर्यादित असलेली ही सुविधा सर्व उपनगरीय स्थानकांवर उपलब्ध करण्यात येणार आहे. ही योजना केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर कार्यक्षम आणि शहरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणारी ठरणार आहे. तसेच रेल्वेच्या जागांचा योग्य वापर आणि रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठीचा हा उपाय ठरणार आहे. 

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकांजवळच्या  नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना उपयुक्त ठरणाने विविध उपक्रम पश्चिम रेल्वेकडून राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पश्चिम रेल्वेच्या सर्व स्टेशनच्या बाहेर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. या योजनेमुळे इलेक्ट्रिक बाइक वापरकर्ते आता स्टेशनवर येऊन काही मिनिटांत आपली जुनी बॅटरी बदलून पूर्ण चार्ज झालेली नवीन बॅटरी घेऊ शकतील. ही प्रक्रिया मोबाइल ॲपच्या साहाय्याने पारदर्शक पद्धतीने पार पडेल. पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमामुळे स्मार्ट लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल, असे  प्रशासनाचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक बाइक बॅटरी चार्जिंग स्टेशनमुळे रेल्वेच्या जागांचा उत्तम वापर होईल. पारंपरिक चार्जिंगच्या तुलनेत ही सेवा जलद असेल. सामान्य बाइक वापरणाऱ्या नागरिकांना इंधन भरण्यासाठी वेळ आणि इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल.   

मोकळ्या जागांचा वापर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये ३७ उपनगरीय स्थानके आहेत. या स्थानकांनजीक रेल्वेच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. वापराविना असणाऱ्या या जागांवर अनेकदा अतिक्रमणे होतात. ती हटवताना रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. या जागांचा योग्य वापर करण्याबरोबरच नागरिकांना उपयुक्त होईल या दृष्टीने प्रशासन इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन प्रकल्प राबवत आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. 

प्रथम सहा स्टेशनांवर सुविधाप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सहा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन परिसरात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये विरार, सांताक्रूझ, गोरेगाव, अंधेरी,  कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांजवळ असलेल्या रेल्वेच्या एकूण ६६७ चौरस फूट जागेत हे बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्यात येईल. 

कशी असेल सुविधा?इलेक्ट्रिक दुचाकीस्वार आणि तीनचाकी वाहनधारक दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात आपल्या वाहनाची संपलेली पॉवर पॅक ई-बॅटरीच्या जागी चार्ज झालेली बॅटरी बसवू शकतील. सर्व ई-स्वॅप युनिट्स सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणीय मानकांनुसार बसवले जातील. त्यामुळे सामान्य नागरिक, रेल्वे प्रवासी, डिलिव्हरी एजंट आणि फ्लीट ऑपरेटरसारख्या दैनंदिन ईव्ही वापरकर्त्यांची गैरसोय दूर होईल. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक