शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार?

By नंदकिशोर पाटील | Updated: January 9, 2023 15:28 IST

नाशिकच्या प्रस्तावित धरणाला मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने कडाडून विरोध करायला हवा होता.

- नंदकिशोर पाटीलमराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागात गोदावरी नदीवर आणखी एखादे धरण बांधू नये, असा निर्णय २००४ साली झालेला असताना नाशिक जिल्ह्यातील दोन धरणांना राज्य सरकारने मंजुरी देऊन टाकली आहे. यासंदर्भात पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी शंकरराव नागरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ऊर्ध्व भागात नवीन धरण बांधून मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळविण्याचा हा डाव आहे. नागरे यांच्यासारख्या सजग अभियंत्याच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हे बरेच झाले. पण एवढा मोठा निर्णय होत असताना मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी झोपा काढत होते का? नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात यावर का आवाज उठवला नाही? या अधिवेशनात मराठवाड्यातील आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न हे अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित गैरव्यवहारांसंदर्भात होते. त्यापैकी किती चर्चेला आले, किती ‘मॅनेज’ झाले, यावर अधिक भाष्य न केलेले बरे.

खरेतर पाणी हा मराठवाड्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे. सिंचनाअभावी पिकावू जमिनीचे वाळवंट होण्याची भीती आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले. नेत्यांचे साखर कारखाने जोरात आहेत. पण ते कालव्या खालचे नव्हे तर बोअरवेलच्या पाण्यावरचे आहे. जमिनीची अक्षरश: चाळण झाली आहे. भूगर्भातील जलसाठा आज ना उद्या संपणार आहे. शाश्वत सिंचनाशिवाय पर्याय नाही. पण पाणी हा विषय या प्रदेशातील नेत्यांची ‘प्रायोरिटी’ नाही. लातूर जिल्ह्यातील रायगव्हाण मध्यम प्रकल्पात मांजरा धरणाचे पाणी सोडावे, एवढाच काय तो विषय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. वास्तविक, नाशिकच्या प्रस्तावित धरणाला मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने कडाडून विरोध करायला हवा होता. पण आपले श्रेष्ठी नाराज होतील. मंत्रीपद मिळणार नाही किंवा मिळालेले काढून घेतले जाईल, या भीतीपोटी सत्ताधारी गप्प. अन् विषयाचे गांभीर्य लक्षात न आल्याने विरोधक सुसेगात! विदर्भ अथवा प. महाराष्ट्राबाबत असा अन्यायकारक निर्णय झाला असता तर तिकडच्या नेत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले असते. मागासलेपण आपल्या वृत्तीतच आहे. सरकारशी भांडून हक्काचे काही पदरात पाडून घेण्याची वृत्तीच नाही. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, भाई केशवराव धोंडगे, भाई उद्धवराव पाटील हे नेते काळाच्या पडद्याआड गेले अन् मराठवाड्याचा आवाज बंद झाला.

गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. मात्र, यापैकी एकही नदी बारमाही वाहत नाही. पावसाळा संपताच नदीपात्र कोरडे पडते. मराठवाडा हा अतितुटीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. परभणी वगळता इतर जिल्ह्यात सिंचनाखालील क्षेत्र खूप कमी आहे. पडणारा पाऊस, उपलब्ध होणारे पाणी आणि सिंचनाचा अनुशेष हे गणित आजवर कधीच जुळले नाही. गोदावरी लवादाच्या निर्णयानुसार ६० टीएमसी पाणी साठवून वापरायला मराठवाड्याला परवानगी दिली होती. या पाण्यांपैकी ४२ टीएमसीच पाण्याचा वापर होत असल्याचे समितीने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. अद्यापही गोदावरी खोऱ्यातील १८ टीएमसी पाण्याचा वापर होत नाही. या पाण्याचा वापर होण्यासाठी मराठवाड्यात २६३ सिंचन प्रकल्प उभारण्याची शिफारस समितीने केली आहे. मात्र, मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष नसल्याचे कारण सांगून नवीन प्रकल्प उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली.

यंदा जायकवाडी धरणातून सर्वाधिक म्हणजे १३० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यापैकी फक्त ३.३८ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या वाट्याला आले. उर्वरित पाणी वाहून गेले आहे. आंतरराज्य लवादानुसार जायकवाडी खालील भागात ६० टीएमसी पाणी साठवण्याचा अधिकार महाराष्ट्राला आहे. यासाठी २५० हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमतेचे छोटे प्रकल्प उभारण्यास आंतरराज्य समितीने मान्यता दिलेली आहे. प्रत्यक्षात हे प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. जायकवाडी धरणाची साठवण क्षमता १०२.७३ टीएमसी आहे. मात्र, गाळामुळे एकूण २८ टीएमसी साठवण क्षमतेत घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांत २६२ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले. एवढ्या पाण्यात जायकवाडी दोनदा पूर्ण भरले असते! हक्काचे पाणी वाहून जाते. आता गोदावरीच्या वरच्या भागात आणखी धरणं झाली तर जायकवाडीही भरणार नाही. पुढच्या पिढ्यांना प्यायचे पाणीही मिळणार नाही. हक्काच्या पाण्यासाठी आता नेत्यांवर विसंबून न राहाता जनचळवळ उभी करावी लागेल.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद