शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जग महाभयंकर वळणावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 05:19 IST

इराणचे मुद्दे अमेरिका कबूल करणार नाही. 

बेभरवसा, लहर, विक्षिप्तपणा अशा अस्थिर मानसिकतेच्या विशेषणांचे धनी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमार्फत पाठविलेला पंधरा कलमी शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला आणि स्वतःचा पाच कलमी प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला. या दोन्ही प्रस्तावांचे वैशिष्ट्य हे की, अणू कार्यक्रम थांबवा, समृद्ध युरेनियमचा साठा आंतरराष्ट्रीय निगराणीत ठेवा वगैरे अमेरिकेचे मुद्दे इराणला मान्य होणारे नाहीत आणि मध्यपूर्वेतील तळ बंद करा, भविष्यात हल्ल्याची आगळीक करणार नसल्याचा शब्द द्या किंवा सुएझ कालव्याप्रमाणे होर्मुझ सामुद्रधुनीत टोलवसुलीची परवानगी द्या वगैरे इराणचे मुद्दे अमेरिका कबूल करणार नाही. 

अमेरिकेसोबत युद्धाची रणभेरी वाजविणाऱ्या इस्रायलला तर मुळात ही शांततेची बोलणीच मान्य नाहीत. परिणामी, गेल्यावर्षी गाझापट्टी किंवा इराणवरील हल्ले थांबविण्याचा ट्रम्प यांचा आदेश जसा धुडकावला होता तशा तयारीत पुन्हा इस्रायल दिसते. जगावरील इंधन संकट, शेअर बाजारातील पडझड किंवा एकूणच आर्थिक संकटाची जितकी चिंता अमेरिकेला, डोनाल्ड ट्रम्प यांना आहे, तितकी ती इस्रायलला नाही. किंबहुना त्या संकटाचा विचारच इस्रायल करीत नाही. हे युद्ध फसले आणि इराणमधील राजवट बदलण्यात, आण्विक कार्यक्रम व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात अपयश आले की, इराण वरचढ होईल. 

मध्यपूर्वेतील कट्टरपंथी, दहशतवादी संघटना डोके वर काढतील, सगळे मिळून आपल्याला नकाशावरून मिटवायचे प्रयत्न करतील, अशी भीती इस्रायलला आहे. त्यामुळे 'आम्हीच जिंकलो, आम्हीच जिंकलो' म्हणत अमेरिकेने माघार घेतली तरी इस्रायल हल्ले थांबविणार नाही. ट्रम्प यांच्या पाच दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा धाब्यावर बसवून इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत. अशाच हल्ल्यात गुरुवारी होर्मुझ सामुद्रधुनीत जगाची कोंडी करणारे नाविक दलाचे कमांडर अलिरेजा तांगसिरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या पार्श्वभूमीवर, पाच दिवसांचा युद्धविराम शनिवारी संपुष्टात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय करतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

युद्धबंदी व शांततेच्या मार्गातील पंधरा व पाच कलमी प्रस्तावांची वासलात अगदी प्रारंभीच लागल्याचे दिसते. त्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची विश्वासार्हता हीदेखील अडचण आहे. कारण, औपचारिकता म्हणून इराणचे काही नेते, विशेषतः ट्रम्प यांचा माणूस म्हणून ओळख असलेले इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घालीबाफ पाक नेत्यांची चर्चा करीत असले तरी मुळात पाकिस्तानच अमेरिकेच्या हातचे बाहुले असल्याने जग मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीबद्दल गंभीर नाही. इराणच्या कडव्या प्रतिकाराने अमेरिका अडचणीत आली आहे. इस्रायल व अमेरिकेचे युद्धासंबंधीचे आडाखे इराणने हाणून पाडले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व इस्रायलला तितकेसे नसले तरी अमेरिकेची कोंडी त्यामुळेच झाली आहे. 

जगाच्या एकूण इंधनापैकी वीस टक्के, खतांची ३३ ते ३८ टक्के आणि हेलियमची एकतृतीयांश वाहतूक रोखून या सामुद्रधुनीत जगाची आर्थिक नाकेबंदी केली जाईल, याची कल्पना अमेरिकेने केली नव्हती. परिणामी, इराक किंवा अफगाणिस्तानप्रमाणे आणखी एका प्रदीर्घ युद्धाच्या कात्रीत अमेरिका सापडली आहे. त्यात अडकलेले डोनाल्ड ट्रम्प बाहेर पडण्यासाठी एकीकडे शांतिदूताचा आव आणीत एकतर्फी युद्धविराम जाहीर करीत आहेत आणि दुसरीकडे मात्र मोठ्या युद्धाची तयारी करीत आहेत. 

विशेषतः थेट मैदानात सैन्य उतरविण्याची तयारी सुरू आहे. अत्यंत निष्णात कमांडोंची तुकडी अशी ओळख असलेली ८२वी एअरबोर्न डिव्हिजन इराणमध्ये उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मैदानी युद्ध लढायचे असेल तर इराणचे कोण कोण शेजारी मदत करतील, याचीही कदाचित चाचपणी सुरू असेल. आधीच इराणच्या हल्ल्यांनी घायाळ झालेले आखाती देश त्यासाठी किती उत्साह दाखवतील, हा प्रश्न आहे; परंतु त्यादृष्टीनेच पाकिस्तानचे लाड सुरू असावेत; पण युद्धाने असे विनाशकारी वळण घेतले तर ते केवळ आखाती देशांपुढेच नव्हे, तर अख्ख्या जगावर महाभयंकर संकट असेल. 

कारण, युद्ध केवळ मैदानात लढले जाणार नाही. दोन्हींकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची भीती आहे. तसे झाले तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अमेरिकेने टाकलेले अणुबॉम्ब आणि अपरिमित जीवितहानीनंतर झाला होता. तेव्हाच्या जखमा ऐंशी वर्षांनंतरही पुरत्या भरलेल्या नाहीत आणि जग पुन्हा एकदा तशाच महाभयंकर संकटाच्या तोंडावर उभे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : World on a dangerous turn: Iran-US tensions escalate.

Web Summary : Iran rejected the US peace proposal, escalating Middle East tensions. Israel disregards ceasefire calls, continuing attacks. The world faces potential economic crisis and the threat of nuclear war. A major global conflict looms.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायल