शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

प्लॅस्टिकबंदीनंतर आता कारबंदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 12:31 AM

‘जीडीपीमध्ये वाढ म्हणजे विकास’, अशी जर व्याख्या असेल तर विकास म्हणजे निसर्गावर, पर्यावरणावर केलेला हल्ला असंच चित्र आज जगभरातून आढळतं.

- हेमंत लागवणकर (विज्ञान प्रसारक)‘जीडीपीमध्ये वाढ म्हणजे विकास’, अशी जर व्याख्या असेल तर विकास म्हणजे निसर्गावर, पर्यावरणावर केलेला हल्ला असंच चित्र आज जगभरातून आढळतं. कारण, उत्पादकता वाढवायची असेल तर त्यासाठी लागणारा कच्चा माल निसर्गातूनच मिळवला जातो. पर्यावरणाचा समतोल राखून जर विकास साधायचा असेल तर कदाचित जीडीपीवाढीच्या दरात काही प्रमाणात एक तर तडजोड करावी लागेल; किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल. पण विकास आणि पर्यावरण समतोल यातली सीमारेषा अत्यंत धूसर आहे.वाढता विकास आणि चंगळवादी जीवनशैली यांची युती झाल्यामुळेसुद्धा आपल्याला अनेक वाईट परिणामांना सामोरं जावं लागत आहे. चंगळवादी जीवनशैली अंगात भिनल्यामुळे आलेली बेफिकीर वृत्तीही अनेकदा आपल्याला अडचणीत आणते. यासंदर्भात प्लॅस्टिकबंदीचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.गेल्या दोन ते तीन दशकांपासून आपलं जीवन अक्षरश: व्यापून टाकणाऱ्या प्लॅस्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करण्यासाठी कारणीभूत ठरला तो त्याचा नैसर्गिकरीत्या अविघटनशील असलेला गुणधर्म. दोष प्लॅस्टिकचा नाही; तर दोष आपल्या सदोष कचरा व्यवस्थापनाचा आणि बेफिकीर वृत्तीचा आहे. जगभरातून दरवर्षी साधारण ऐंशी लाख टन प्लॅस्टिक वापरलं जातं आणि त्यातलं बरंचसं प्लॅस्टिक वापरून झाल्यावर जातं समुद्रामध्ये! याच वेगाने जर समुद्रात आपण प्लॅस्टिक ढकलत राहिलो तर २०५० सालापर्यंत जगभराच्या समुद्रामध्ये मासे आणि इतर जलचरांपेक्षा प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असेल.या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि शेवटी प्लॅस्टिकबंदी करावी लागली. आता आणखी एक बंदी आपल्या अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपली आहे; ती म्हणजे ‘कारबंदी’! स्पेन सरकारने माद्रीद या राजधानीच्या मध्यवर्ती भागात तिथे राहणाºया रहिवाशांच्या मोटारगाड्यांशिवाय इतर मोटारगाड्यांना या महिन्यापासून बंदी केली आहे. या बंदीमागचं मुख्य कारण आहे, वाहनांमुळे होणारं हवाप्रदूषण! पण या बंदीमुळे तिथल्या नागरिकांना जसा मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे, तशी फिरण्यासाठी मोकळी जागाही मिळणार आहे. अर्थात, अशी बंदी अमलात आणणारं माद्रीद हे काही पहिलं उदाहरण नाही. कोपनहेगन, ब्रुसेल्स, म्युनिच या शहरांमध्ये अशा प्रकारची बंदी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरातल्या हवेमध्ये नायट्रोजन डायआॅक्साइडचं प्रमाण प्रति घनमीटर ४० मायक्रोग्रॅम या युरोपियन कमिशनने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा नेहमीच जास्त आढळत होतं. त्यामुळे या शहरात हवाप्रदूषण रोखण्यासाठी डिझेलवर चालणाºया मोटारगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यापासून फ्रान्सच्या राजधानीत, पॅरिसमधील मध्यवर्ती भागात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मोटारगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. हवाप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी २०२० सालापासून लंडनमध्ये डिझेलवर चालणाºया गाड्यांवर बंदी आणण्याचा विचार गांभीर्याने केला जातो आहे.म्हणूनच आता प्लॅस्टिक आणि फटाक्यांनंतर नजीकच्या भविष्यात आपल्याला कारबंदीलाही सामोरं जावं लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :carकारPlastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषण