शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

Adhyatmik : नम: सभाभ्य:

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:25 IST

प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.

- डॉ. गोविंद काळेप्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.भगवान शंकराला प्रिय असलेल्या ‘रुद्रसूक्त’मधील ऋषी म्हणतात ‘नम: सभाभ्य: सभापतिश्च वो नमो’ सभेला पहिला नमस्कार. नंतर सभापतीला. सभा आहे म्हणून सभापती. शंकराच्या अभिषेकासाठी म्हटले जाणारे हे वेदमंत्र पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लोकशाहीचा डंका पिटला. भगवंतांनी गीतेमध्ये ‘लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि’ असे अर्जुनाला सांगताना लोकमहतीला प्राधान्य दिले आहे. संस्कृत साहित्यातील लोकशाहीच्या वैश्विक विचारमूल्यांचे जतन संवर्धन पुढे संतसाहित्याने केले. ‘वक्ता वक्ताचि नोहे श्रोतेविण’ असे माउली लिहिती झाली. सभा आहे म्हणून सभापती, श्रोतृवर्ग आहे म्हणून वक्ता, लोक आहेत म्हणून नेता. लोकशाही म्हणून संसद, समर्थांनी ‘जनाचा प्रवाह चालिला पाहिजे/ जन ठायी ठायी तुंबला म्हणजे खोटे’ असे सांगताना जनप्रवाह म्हणजे लोकमताचाच आदर केला.आपल्या विचारवंतांनी लोककल्याणाचेच गीत गायले. यद्यपि सिद्धम् लोकविरुद्धम/ नाकरणीयम् नाचरणीयम्’ हे विचार लोकशाहीची पाळेमुळे बळकट करणारेच आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी जाणीवपूर्वक डावलण्याचे प्रयत्न आपण करतो. घरामध्ये कामधेनू असताना शेजाऱ्याकडे आपण ताक मागतो हा राष्टÑ दैवदुर्विलासच मानावा लागेल. शंकरापेक्षा सुद्धा लोकशंकराचे स्थान लोकशाहीत मोठे. आपण लोक शंकराची कवाडे बंद करून टाकली आहेत असे म्हणण्याची पाळी येऊ नये. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे गीत आळवणाºयांनी वेळीच सावध होऊन कार्यरत झाले पाहिजे. वारसा जपला पाहिजे. बॅ. नाथ पैंनी लोकसभेत लोकशाहीच्या पुष्ट्यर्थ ‘लोकशक्ति: विशिष्यते’ हा श्लोक खासदारांना अनेकवेळा ऐकविला होता. राजसत्तेचे अधिष्ठान लोकशक्ती आहे. राजसत्ता आणि लोकसत्ता यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या बाजूनेच राहिले पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक