शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जनमन - विद्यार्थी ‘विद्यार्थी’ असतो, मुलगा-मुलगी असा फरक नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:29 IST

उच्च शिक्षण महाग झाल्याने केवळ मुलींचेच नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचे देखील उच्च शिक्षणातील प्रमाण कमी होत आहे

‘मुलींना शुल्कमाफी, गरजू मुलांचे काय?’ हा डॉ. सुनील कुटे यांचा लेख (दि. १४ फेब्रुवारी) वाचला. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे त्या मुलींचे शंभर टक्के शुल्क सरकार भरणार आहे. या प्रस्तावित निर्णयाचे स्वागत.

उच्च शिक्षण महाग झाल्याने केवळ मुलींचेच नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचे देखील उच्च शिक्षणातील प्रमाण कमी होत आहे. राज्यभरात आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षण मागणीच्या अनेक कारणांमध्ये महागलेले उच्च शिक्षण हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शेतीत उत्पन्न नाही. त्यामुळे महागडे उच्च शिक्षण घेता येत नाही. शिक्षण नाही म्हणून रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून पैसा नाही. हे एक दुष्टचक्र आहे. कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी शिक्षणच आवश्यक असते. शिक्षणाच्या बाबतीत सवलत देताना मुलगे आणि मुली असा फरक करु नये, असेही सुचवावेसे वाटते. एकाच आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या मुलींपेक्षा मुलांना वेगळा न्याय लावण्याची गरज नाही. पैशांअभावी मुलींचेच नव्हे, तर गुणवत्ताधारक मुलांचेही शिक्षण थांबू नये. 

प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देताना जात, धर्म, लिंग याआधारे सवलती नको. सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षण ही जबाबदारी सरकारने घ्यावी. खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम यासाठीची शुल्कपूर्ती करताना ती सरसकट करून सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे. दर्जेदार शिक्षणातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची उभारणी होते. ज्या राष्ट्रांनी जगात आर्थिक महासत्ता म्हणून स्थान मिळविले आहे त्यांचा पायाच शिक्षण व संशोधन आहे. विद्यार्थ्यांना जात, धर्म, लिंग पाहून सवलत देण्यापेक्षा विद्यार्थी म्हणून सवलत द्यावी.

- शिवाजी काकडे,पाथ्री, ता. फुलंब्री 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीchandrakant patilचंद्रकांत पाटील