शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

२६३ वर्षांपूर्वीची संघर्षपूर्ण आणि निर्णायक संक्रांत...

By पुष्कर कुलकर्णी | Updated: January 14, 2024 10:55 IST

पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले.

- डाॅ. पुष्कर कुलकर्णी 

१७ व्या शतकात भारताचा मोठा भूभाग मराठा साम्राज्यात होता. मराठ्यांनी अटकेपार भगवा रोवल्यावर तिळपापड झालेला अफगाण लुटेरा अहमदशाह अब्दाली हा रोहिलखंडच्या नजीबच्या बोलविण्यावरून पुन्हा एकदा भारतात आला. नजीबला मोगलांकडे असलेले दिल्लीचे तख्त हवे होते. अब्दालीला अटकाव करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच होती. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात मोठे सैन्य पुण्यातून उत्तरेत कूच झाले. २६३ वर्षांपूर्वी १४ जानेवारी १७६१ रोजी संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले. परकीयांच्या आक्रमणापासून मायभूमीच्या संरक्षणार्थ झालेल्या या लढाईत आपल्या मातीचा इमान राखत अगणित शूर योद्धे धारातीर्थी पडले. मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम, असे या युद्धाचे वर्णन केले जाते. 

युद्धाच्या वर्षभरापूर्वी म्हणजे १७६० मध्ये उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. यात सदाशिवरावभाऊंनी निजामाचा तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गारदी याला मराठ्यांकडे घेतले. पानिपतच्या युद्धातही मराठ्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व इब्राहिमकडे दिले होते. युद्धापूर्वी अब्दालीने धर्माचा शब्द टाकून त्याला वळविण्याचा प्रयत्न केला. पण स्वकीय इमान राखत याच त्याने मैदान गाजवून अब्दालीला नाकीनऊ आणले. मराठा शूर सरदारांनी पाठ न दाखवता शेवटपर्यंत बाजी लावून वीरमरण स्वीकारले. सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे यांनाही वीरमरण आले. मल्हारराव होळकर यांनी महिलांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढून सदाशिवरावभाऊंनी दिलेले कर्तव्य बजावले. 

शिकण्यासारखेबरेच काही...दिल्लीचे रक्षण करणाऱ्या मराठ्यांना साथ दे, असे सांगूनही आपल्या आईचे न ऐकता शेवटच्या निर्णायक घडीत अवधचा सुजा अब्दालीकडे वळला. दिल्लीचे तख्त मिळावे ही अट राखत सूरजमल जाट यांनी युद्धात मराठ्यांच्या बाजूने न लढण्याचा निर्णय घेत तटस्थ भूमिका स्वीकारली. दरवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत युद्धाच्या स्मरणार्थ मराठ्यांचे शौर्य आठवते... धर्म आड न आणता आपल्या भूमीसाठी इमान राखत वीरमरण पत्करलेल्या योद्ध्यांची आठवण येते. वर्तमानातील पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती