शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीमुळे धुळे जिल्ह्यातील राष्टÑीय पेयजलच्या ७३ योजनांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 11:24 IST

४५ कोटींचा मंजूर आराखड्यातील कामे रखडली, सव्वा महिना पहावी लागणार वाट

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या काही विकास कामांनाही तूर्त ‘ब्रेक’ लागला आहे. आचारसंहितेमुळे ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत राष्टÑीय पेयजलच्या ७३ योजनांचे काम ठप्प झाले आहे. यासाठी ४५ कोटींचा आराखडा मंजूर झालेला आहे. दरम्यान बांधकाम विभागाचीही काही कामे रखडण्याची शक्यता आहे.धुळे जिल्हा परिषदेची मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजीच संपुष्टात आलेली आहे. मात्र आरक्षणाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने, सुरवातीला विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.दरम्यान नुकतीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली. त्यामुळे जिल्हा परिषदे अंतर्गत रखडलेल्या काही विकास कामांना सुरूवात झाली होती. मात्र मंगळवारी जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होऊन त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाल्याने, विविध कामांनाही पुन्हा एकदा तूर्त ब्रेक लागलेला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ‘राष्टÑीय पेयजल’च्या २०१९-२० या वर्षासाठी तब्बल ९८ योजना मंजूर झालेल्या आहेत. यापैकी २५ योजनांना कार्यारंभ देण्यात आलेला असून, ७३ योजनांचा आराखडा मंजूर झालेला आहे. यासाठी ४५ कोटी रूपयांचा आरखडा तयार झालेला आहे. मात्र आचारसंहितेमुळे आता ७३ योजनांचे काम जवळपास सव्वा महिना रखडणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच त्या योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.बी.पढ्यार यांनी दिली.मोठ्या योजनेचा समावेशदरम्यान आराखड्यात मंजूर ७३ पैकी दोन योजना या महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या आहेत. यातील एक योजना शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणेसह इतर ८५ गावांना तापी नदीवरून पाणी पुरवठा देण्याची आहे. ही योजना तब्बल ३०० कोटी रूपयांची आहे.या योजनेसाठी एका खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी टेंडर काढण्यात येणार होते. मात्र मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने, टेंडरचे कामही तूर्त थांबणार आहे.याशिवाय जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या बांधकाम विभागाची कोणती कामे टेंडर प्रक्रियेत आहे, याची माहिती घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

टॅग्स :Dhuleधुळे