जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, ५६ पैकी ३९ जागांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:57 IST2020-01-08T15:57:35+5:302020-01-08T15:57:54+5:30

अंतिम निकाल : काँग्रेस ७ , राष्ट्रवादी ३, सेना ४, अपक्षने मिळविल्या ३ जागा

In the Zilla Parishad elections, the BJP won a clear majority, winning 19 of the 6 seats | जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, ५६ पैकी ३९ जागांवर विजय

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, ५६ पैकी ३९ जागांवर विजय

धुळे : जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे आले आहे़ यात ५६ जागांचा निकाल हाती आला आहे़ यात ३९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केला आहे़ यात शिरपूर तालुक्यात सर्वच्या सर्व १४ जागा, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ७ आणि धुळे तालुक्यात १० याप्रमाणे ३९ जागांवर विजय संपादन केला़ तर, काँग्रेसने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३ जागा तर शिवसेनेने ४ जागा मिळविल्या आहे़ याशिवाय अपक्ष ३ उमेदवार यात विजयी झाले आहे़ या निकालानंतर बहुमतांची २९ जागांची मॅजिक फिगर गाठून ३९ जागा मिळवत भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केले़

Web Title: In the Zilla Parishad elections, the BJP won a clear majority, winning 19 of the 6 seats

टॅग्स :Dhuleधुळे