जिल्हा परिषदेचा ९८.५० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:39+5:302021-03-27T04:37:39+5:30
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॅा.तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सभेस व्यासपीठावर उपाध्यक्षा ...

जिल्हा परिषदेचा ९८.५० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॅा.तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सभेस व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, समाज कल्याण समिती सभापती मोगरा पाडवी,मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळेादे, आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या सभापती कुसुम निकम यांनी अर्थसंकल्प सादर केला.
यात २०२०-२१ ची सुधारित अंदाजपत्रकातील अखेरची शिल्लक रक्म ७ कोटी ४० लाख ६२ हजार व सन २०२१-२२ ची अपेक्षित जमा ७ कोटी ६२ लाख ८० हजार असे एकूण १५ कोटी ३ लाख ४२ हजार मधून २०२१-२२ साठी प्रस्तावित करऱ्यात ओल्या खर्चसाठी १४ कोटी ४ लाख ९२ हजार रूपे वजा जाता ९८ लाख ५० हजाराचा हा शिलकी अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षणासाठी १ कोटी ४३ लाख रूपये प्रस्तािवत करण्यात आले आहे. तर शिक्षणासाठी १ कोटी २१ लाख २५ हजार रूपयांचा निधी प्रस्तावित केलेला आहे.सार्वजनिक आरोग्यासाठी ८५ लाख, पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी ७८ लाख , ठेव संलग्न, विमा योजनेसाठी ८ लाख २२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी १ कोटी २० लाख , महिला व बालकल्याण विभाागासाठी ५३ लाख ५४ हजार, कृषीसाठी ७५ लाख, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय,आणि इंधन वैरणासाठी ६० लाख रूपये, पंचायत राज कार्यक्रमासाठी सर्वाधिक ५ कोटी १३ लाख १३ हजार रूपये, लहान पाटबंधाऱ्यासाठी २८ लाख, परिवहनसाठी १ कोटी २० लाख अशी एकूण १४ कोटी ०४ लाख ९२ हजाराचा हा मूळ अर्थसंकल्प आहे.
सभासदांनी बाके वाजवून केले स्वागत
दरम्यान अर्थ समिती सभापतींनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याबद्दल सत्ताधारी गटातील सदस्यांनी बाके वाजवून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर विरोधीपक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी लहान पाटबंधारेसाठी अत्यल्प तर वनीकरणासाठी कुठलाच निधी प्रस्तावित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
कोरोनासाठी ३० लाखांचा निधी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.त्यावर उपाय योजना करण्यासाठी औषधी,उपकरणे व उपाय योजनांसाठी ३० लाखांची रकमेची तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली आहे.
उत्पन्नात वाढ
सन २०२०-२१च्या वर्षअखेर १० कोटी २४ लाख २३ हजारचे सुधारित उत्पन्न अपेक्षित आहे. सन २०२०-२१साठी गतवर्षी नियोजन करतांना ९७६.३५ लाख अपेक्षित जमेपेक्षा साधारत: ४७.८८ लाख रक्कम जादा प्राप्त झालेली आहे. त्या प्रामुख्याने व्याजाच्या रक्कमेत वाढ झाल्याने, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ झाली.