शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

सभापतीपदी युवराज पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:44 PM

महापालिका : स्थापनेनंतर १४ व्या सभापतीची निवड, महिला बालकल्याण सभापतीपदी निशा पाटील, उपसभापती वाघ

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी युवराज पाटील यांची तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी निशा प्रमोद पाटील व उपसभापतीपदी सुमनबाई वाघ यांची बिनविरोध निवड झाली़शांततेत निवडमनपा स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली़ यावेळी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते़ स्थायी सभापती निवड प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली़ या पदासाठी विहीत मुदतीत इच्छूक पदाधिकाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते़ त्यानंतर अर्जांची छाननी प्रक्रिया झाली व त्यात अर्ज वैध ठरला. त्यावर हरकत घेण्यासाठी वेळ देण्यात आला मात्र या अर्जांवर कुणीही हरकत घेतली नाही़ त्यानंतर माघारीसाठी रितसर १५ मिनिटांचा वेळ देण्यात येऊन ११़३० वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली़ या पदासाठी प्रभाग क्र.१४चे नगरसेवक युवराज चैत्राम पाटील यांचाच एकमेव अर्ज असल्याने सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी जाहीर केले. निवडीनंतर जिल्हाधिकारी रेखावार व आयुक्त देशमुख यांनी सभापती युवराज पाटील यांचा सत्कार केला़त्यानंतर महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़महिला बालकल्याण सभापती, उपसभापतींची निवडमहिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीला दुपारी १ वाजता सुरूवात झाली़महिला बालकल्याण सभापती पदासाठी निशा प्रमोद पाटील व उपसभापती पदासाठी सुमनबाई वाघ यांचेच प्रत्येक एक अर्ज दाखल झाले होते़ छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले़ त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आली़ त्यांनतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सभापतीपदी निशा पाटील व उपसभापतीपदी सुमनबाई वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले़सभेला अनुपस्थित सदस्यमनपा स्थायी समिती सभापती व उपसभापती पदासाठी इच्छूक उमेदवार शेख मेहरूनीसा जाकीर, मंगल अर्जून चौधरी, अन्सारी सईदा महम्मद यांनी या सभेकडे पाठ फिरविली होती़ त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक प्रकिया पार पडली होती़

टॅग्स :Dhuleधुळे