धुळे येथे युवा सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:39 IST2019-08-21T11:38:57+5:302019-08-21T11:39:18+5:30
विद्यार्थ्यांनी तयार केली मानवी साखळी

धुळे येथे युवा सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली
आॅनलाइन लोकमत
धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटीच्या मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकायार्ने आंतरराष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाले.यात महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी एड्स संदर्भात जाणीव जागृतीपर रॅली काढली. मानवी साखळीच्या माध्यमातून विद्यार्थांमध्ये जाणीव जागृती केली.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक प्रमुख शितल पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास चव्हाण होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्टÑीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत जोशी यांनी केले. त्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. मून यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील रेड रीबन क्लबच्या सदस्यांनी पार पाडला. युवागीत सादर करणे, प्रास्तविक, अतिथींचा परीचय व सत्कार, आभार व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेड रीबन क्लब कार्यकारीणी सदस्यांनी पार पाडले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथकातील अधिकारी विलास पाटील यांच्या मागून सर्व उपस्थितांनी एड्स प्रतिबंध विषयक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.