तापी नदीत पडून तरुण बेपत्ता लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:54 IST2017-08-01T04:54:27+5:302017-08-01T04:54:27+5:30

कानबाई विसर्जनावेळी सोमवारी सकाळी चार तरुण तापी नदीत पडले. तिघांना वाचविण्यात यश आले असून सागर विजय निकुुंभ हा बेपत्ता आहे.

Youth disappeared in Tapi river | तापी नदीत पडून तरुण बेपत्ता लोकमत न्यूज नेटवर्क

तापी नदीत पडून तरुण बेपत्ता लोकमत न्यूज नेटवर्क

शिंदखेडा (जि. धुळे) : कानबाई विसर्जनावेळी सोमवारी सकाळी चार तरुण तापी नदीत पडले. तिघांना वाचविण्यात यश आले असून सागर विजय निकुुंभ हा बेपत्ता आहे. मुडावदा (ता. शिंदखेडा) येथे ही दुर्घटना घडली.
तापी नदीला पूर आलेला आहे़ मूर्ती विसर्जन करण्यासाठी नदीकाठावर गर्दी झाली होती़ विसर्जनावेळी निकुंब कुटुंबातील सागर, बंटी, राजेश, पंकज निकुंभ हे पाण्यात पडले. गावक-यांनी तिघांना वाचविले. संध्याकाळपर्यंत सागरचा शोध लागला नव्हता.

Web Title: Youth disappeared in Tapi river