चाळीसगाव रोडवर ट्रकच्या धडकेत गरताडचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 21:23 IST2021-03-31T21:23:17+5:302021-03-31T21:23:27+5:30
ट्रकचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद

चाळीसगाव रोडवर ट्रकच्या धडकेत गरताडचा तरुण ठार
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवर हॉटेल फाय फायसमोर भरधाव येणाऱ्या मालट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने धुळे तालुक्यातील गरताड येथील मनोज भामरे हा तरुण ठार झाला. मंगळवारी दुपारी अपघाताची ही घटना घडली.
समाधान गणेश पाटील (रा. गरताड, ता. धुळे) याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे-चाळीसगाव रोडवर मालट्रक (क्र. एमएच ३४ बीजी ६३९०) चालकाने हॉटेल फाय फायसमोर रोडवरून जात असलेल्या दुचाकीवरील (क्र.एमएच १८ एएम ८६९७) मनोज ऊर्फ छोटू जगन्नाथ भामरे (३५, रा. गरताड, ता. धुळे) याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मोटारसायकलीचेही नुकसान झाले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.