नवागाव वाकपाडा रस्त्यावर अपघात, तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:34 IST2020-12-20T21:34:03+5:302020-12-20T21:34:27+5:30
सांगवी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

नवागाव वाकपाडा रस्त्यावर अपघात, तरुण जागीच ठार
बोराडी - शिरपूर तालुक्यातील नवागाव वाकपाडा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. अपघाताची ही घटना साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़ सांगवी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़
राकेश गोविंदा पावरा (२२, रा़ अंबाडूपाडा ता़ शिरपूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे़ नवागाव येथून राकेश पावरा हा वकवाड येथे एमएच १८ एई ६१६६ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात असताना सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या धडकेत राकेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ अपघाताची माहिती राकेश याचा भाऊ गोपाल याला मिळाल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली़ रात्री ८ वाजेच्या सुमारास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ़ अमोल जैन यांनी तपासून मयत घोषीत केले़ अपघाताची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलपगारे घटनेचा तपास करीत आहेत़