नगरपंचायत वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:12 IST2020-12-19T21:12:06+5:302020-12-19T21:12:32+5:30
शिंदखेडा येथील घटना, गुन्हा दाखल

dhule
शिंदखेडा : येथील चिरणे रोडवरील रज्जाक नगरात भागात नगरपंचायतीच्या भरधाव वेगातील वाॅटर एटीएम वाहनाने धडक दिल्याने रफीक शेख शब्बीर (३५) हा तरुण जागीच ठार झाला.
शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमाराला हा अपघात झाला. वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने त्याचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. सदर वाहन सरळ लाल मोहम्मद शेख बशीर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये शिरले. त्यात शेडचे देखील नुकसान झाले. रफीक शेख शब्बीर हा वाहनात अडकला होता. सुमारे २५ ते ३० फुट त्याला फरफटत नेले. या अपघातात अशपाक शेख मन्सुरी (४०) हे सुदैवाने बचावले. मदत आणि बचाव कार्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी अशपाक शेख मन्सुरी याच्या फिर्यादीवरुन जखमी वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला.