क्षुल्लक कारणावरून तरुणावर पावडीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:03+5:302021-04-05T04:32:03+5:30
देवपुरातील रमाबाई आंबेडकरनगरात राहणारे विशाल प्रकाश जाधव (२५) या तरुणाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घरासमोर मोटारसायकल ...

क्षुल्लक कारणावरून तरुणावर पावडीने हल्ला
देवपुरातील रमाबाई आंबेडकरनगरात राहणारे विशाल प्रकाश जाधव (२५) या तरुणाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घरासमोर मोटारसायकल का लावली, या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पडसाद हाणामारीत उमटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. शिवीगाळ करीत एकाने पावडी माझ्या दिशेने उगारली असता, ती वाचविली, पण ती माझ्या हाताला लागल्याने उजव्या हाताला दुखापत झाली. हाताबुक्क्यानेही मारहाण करण्यात आली. घरात घुसून दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आला, शिवाय दुकानातील गल्ल्यात ठेवलेले १ हजार ७०० रुपये बळजबरीने हिसकावून घेण्यात आले. हा सर्व प्रकार गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. यात विशाल प्रकाश जाधव या तरुणाला दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याने देवपूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रशांत प्रभाकर जाधव, नरेश दशरथ अहिरे, अशोक नाना अहिरे, मनोज ज्ञानेश्वर साळवे (सर्व रा.रमाबाई आंबेडकरनगर, देवपूर) यांच्या विराेधात भादंवि कलम ३९४, ३२४, ४५२, ४२७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.जी. माळी करीत आहेत.