शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

धुळ्यात मोबाईल हिसकाविणाºयांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:19 PM

शहर पोलीस : १७ मोबाईल, १ दुचाकीसह दोघांना अटक

ठळक मुद्देशहर पोलिसांच्या गोपनीय शाखेची कामगिरीदोन संशयितांकडून १७ मोबाईल, १ दुचाकी हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चालत्या गाडीवरुन मोबाईल हिसकावून पळून जाणाºया दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने शिताफिने पकडले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी १७ चोरीचे मोबाईल, १ दुचाकी काढून दिली़ असा एकूण १ लाख २८ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून जप्त करण्यात आला आहे़  अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली़ पायी मोबाईलवर बोलत असताना मोटारसायकलस्वारांनी मागावून येऊन मोबाईल हिसकावून पोबारा केला होता़ ही घटना रविवारी शहर हद्दीत घडली होती़ याशिवाय वेगवेगळ्या भागात मोटारसायकलीवरुन येऊन मोबाईल चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत़ यावर प्रतिबंध लावण्यासाठी दिवसा आणि रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिल्या होत्या़ त्यानुसार, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, यांच्यासह मिलींद सोनवणे, किरण जगताप, भिकाजी पाटील, कबीर शेख, इखलाख पठाण, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, संदिप पाटील, प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, युवराज पवार, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी यांनी मोबाईल चोरांचा शोध घेण्यासाठी गस्त वाढविली़ मोबाईल चोरटे हे चितोड रोड भागातील श्रीराम नगरात राहत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली़ तसेच साक्री रोड भागात ते गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच सापळा लावण्यात आला आणि खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (रा़ दंडेवालेबाबा नगर, मोहाडी, धुळे) आणि शंकर बालकिसन रेड्डी (रा़ रेल्वे स्टेशन रोड, साईबाबा चौक, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली़ त्यांच्या चौकशीतून १७ मोबाईल आणि १ दुचाकी असा एकूण १ लाख २८ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस