शिरपूर तालुक्यात योग दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST2021-06-23T04:23:54+5:302021-06-23T04:23:54+5:30
वरूळ येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग शिक्षक एऩ. एस़. ढिवरे यांनी विविध योग ...

शिरपूर तालुक्यात योग दिवस साजरा
वरूळ
येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग शिक्षक एऩ. एस़. ढिवरे यांनी विविध योग प्रात्यक्षिके याप्रसंगी केली. यात प्राचार्य पी. आर. साळुंखे, मंगला पाटकर, सुनील पाटील, एस. क़े. पाटील, डी़. ए़. जाधव, आऱ. ए़. माळी, एस़. सी़. शिंपी, मनोज पाटील, ए़. बी़. महाजन, रासेयो प्रमुख आर. आर. रघुवंशी, डी़. एऩ. माळी, बी़. एस़. बडगुजर, पी़. टी़. पवार, बापू भिल, राजू सोनवणे आदी सहभागी होते.
सावळदे-
आर. सी. पटेल विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक के. आर. जोशी, एस. आर. बोरसे, एस़. एस. चौधरी, व्ही. एस. बेलदार, सी. जी. पाटील, वाय़. पी़. पाटील, डी. व्ही. जावरे, शिरसाठ, रोकडे आदी उपस्थित होते.
भाजप कार्यालय
शिरपूर येथील भाजप कार्यालयात योग शिबिर घेण्यात आले. या योग शिबिरामध्ये आमदार काशिराम पावरा, भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापुरे, महेंद्र पाटील, रोहित शेटे, प्रशांत राजपूत, रवींद्र भोई, बापू लोहार, किशोर गुरव, जिल्हाध्यक्ष युवा भारत जितेंद्र शेटे, भरत कदम, भगवान ठाकूर, भारत मनोज अटवाल, सुनील गुरव, कल्याण सोनवणे, जयपाल पंजवाणी, जवाहरलाल पारख आदींनी सहभाग घेतला होता.
शिरपूर- येथील सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय व कमलाबाई सखाराम बर्वै कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापिका एम. डी. पावरा, उपमुख्याध्यापिका जे. एल. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. सगरे उपस्थित होते़. विद्यालयातील क्रीडाशिक्षक एम. टी. चित्ते, के. एस. ईशी यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविलेत.
कर्मवीर रणधीर सी.बी.एस.ई. स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग विद्या धाम येथील डॉ़. श्रीकांत वाडिले, योगशिक्षक नारायण तायडे, महेश गिरासे यांचे अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळेतील समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिरपूर- येथील महात्मा ज्योतिबा फुले तांत्रिक माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक व्ही. बी. सोनवणे, उपमुख्याध्यापक प्रल्हाद डी. सोनार, पर्यवेक्षक एन. बी. पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या योगशिक्षक आर. एम. बारी व बी. एस. कोळी यांनी योग प्रात्यक्षिके घेतली. मुख्याध्यापक व्ही. बी. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक प्रल्हाद सोनार यांनी आभार मानले.
फन विथ फिटनेस ग्रुप
फन विथ फिटनेस ग्रुपतर्फे सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्यक्षरित्या साजरा करण्यात आला. यावेळी प्रा़हर्षदा पाटील यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांकडून ते करून घेतले. त्यानंतर डॉ. विनय पवार यांनी योगाविषयी माहिती दिली.
लाकडया हनुमान- तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील जिल्हा परिषद शाळेत भोईटी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनिल बाविस्कर यांनी योगदिनाचे महत्त्व सांगितले.
झेंडेअंजन
येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एस. ए. कुरेशी यांनी जागतिक योग दिवसाचे महत्त्व पटवून दिले. योग शिक्षक एस. एन. पाटील आणि डी. सी. बडगुजर यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून घेतले. यावेळी डी. आर. राजपुत, नरेंद्र म्हस्के, सुनील पाटील, एच. बी. मगरे, जी. डी. शिवदे, डी. सी. बडगुजर, राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते.