शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

यंदा बैल पोळा मानाच्या मिरवणुका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:09 IST

पोळा सणावर कोरोनाचे सावट : पिंपळनेर येथे कार्यक्रम रद्द, जिल्हाभरात साध्या पद्धतीने सर्जा-राजाप्रति कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हाभरात यंदा पोळा सणावर कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट दिसून आले. पिंपळनेर येथे यंदा मानाची मिरवणूक रद्द करण्यात आली. ठिकठिकाणी साध्या पद्धतीने पोळा सण साजरा करुन सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.बैल पोळा मानाच्या मिरवणुका रद्दपिंपळनेर- कोरोना संसर्गजन्य आजारामुळे येथील दोन समाजाच्या बैलपोळा मानाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या. साध्या पद्धतीने घरीच बैल पूजन करून पोळा सण साजरा करण्यात आला आहे.वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. मात्र, यंदा प्रथमच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पोळा सणाच्या मिरवणुकांची परंपरा खंडित झाल्याचे पाहण्यास मिळाले.पिंपळनेर येथे पोळा सण ऐतिहासिक परंपरेनुसार वैशिष्टयपूर्ण रितीने साजरा केला जातो. येथील पोळा फोडण्यासाठी गुलाल उधळीत वाजत-गाजत मराठा पाटील समाज व सगरवंशीय जिरे पाटील समाजाची मानाची मिरवणूक काढण्यात येते व ही परंपरा अजूनही मोठ्या उत्साहाने कायम असते.परंतू यंदा संपूर्ण देशात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने प्रशासनाने मिरवणूका न काढता, गर्दी न करता सण साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महिलांनी साध्या पद्धतीने आरती पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखवत पोळा सण साजरा केला.थाळनेर परिसरात निरुत्साहथाळनेर- शिरपूर तालुक्यातील थाळनेरसह परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सणावर निरुत्साहाचे वातावरण दिसून आले.यावर्षी देशात मार्च महिन्यापासून कोरोनामुळे आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. या संसर्गजन्य आजाराने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. तर काही रुग्णांना या संसर्गजन्य आजारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच परिस्थिती थाळनेर गावात निर्माण झाल्याने यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा करण्यात निरुत्साह दाखविल्याचे चित्र पाहावयास मिळाले.पोळा सणाला बैलाला सजवून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या बैल जोडींची सवाद्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर इतर शेतकरी आपल्या बैलांची मिरवणूक काढत मारुतीच्या पाराला फेरी मारून घरी येऊन शेती अवजारांची व बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य खाऊ घालतात. परंतू यावर्षी कोरोनामुळे परिसरात विपरीत परिस्थिती निर्माण झाल्याने पोळा सणाला निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बाजारपेठेत देखील जास्त प्रमाणात उलाढाल झाली नाही.नवागाव येथे बैल पूजनशिरपुर- तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथे पोळा सणानिमित्त गावातील मुख्य चौकात बैलाची पुजा करण्यात आली. त्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पाराला फेरी मारुन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणुकीची बुडकी येथे सांगता झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी बांधवांच्यावतीने मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला.यावेळी जितेंद्र पावरा, पोलीस पाटील लक्ष्मण पावरा, मंगळ पावरा, अनिल पावरा, जयदास पावरा, रमेश पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.रोहिणी येथे पूजनशिरपूर-तालुक्यातील आदिवासी परिसरासह रोहिणी भागात पोळा सण साजरा करण्यात आला.ग्रामीण भागात पोळा सणाच्या पाच दिवस अगोदरपासून बैलांना कोणतेही जड कामाला लावत नाहीत. पोळा सणाच्या दिवशी सजवून मिरवणूक काढण्यात येते. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.कापडणे येथे निरुत्साहकापडणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी खबरदारी घेत बैलांची घरीच सजावट करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. दरवर्षी वाद्यांच्या गजरात गावातून सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनामुळे मात्र, निरुत्साह दिसून आला.पटेल सीबीएसई स्कूलशिरपूर- शहरातील अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलमध्ये पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना बैलपोळा सणाचे महत्त्व आॅनलाईन अ‍ॅपद्वारे समजावून सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळा साजरा करण्याची पद्धत तसेच महत्व समजावून सांगितले.पूर्वप्राथमिक विभागातील मंजुषा पाटील यांनी पॉवरपॉइंटद्वारे या सणाविषयी सविस्तर माहिती दिली. सिमा लिनाडे व मनीषा कलाल यांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून बैलपोळ्यावर आधारित सुंदर व हृदयस्पर्शी नाटिका सादर करून विद्यार्थ्यांना पोळा सणाचे महत्व सांगितले.यावेळी प्राचार्य निश्चल नायर व उपप्रचार्या अनिता थॉमस यांनी बैलांची पूजा करुन गहू, गूळ व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. सुंदर व आकर्षक फलक लेखन दिपक पाटील, प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.