यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा २८ जुलै रोजी नंदुरबारला विभागीय पदवी वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:30 IST2019-07-25T11:30:26+5:302019-07-25T11:30:58+5:30

नाशिक केंद्राचे संचालक प्रा.डॉ. धनंजय माने यांची माहिती

Yashwantrao Chavan Maharashtra Open University Distribution Degree Ceremony at Nandurbar on 7th July | यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा २८ जुलै रोजी नंदुरबारला विभागीय पदवी वितरण समारंभ

यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा २८ जुलै रोजी नंदुरबारला विभागीय पदवी वितरण समारंभ

आॅनलाइन लोकमत
धुळे : यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा विभागीय पदवी वितरण समारंभ २८ जुलै रोजी जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार येथे होणार असल्याची माहिती नाशिक केंद्राचे संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. माने यांनी सांगितले की यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा २५वा दीक्षांत समारंभ १२ एप्रिल १९ रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात झाला. मात्र या समारंभास अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून २८ जुलै रोजी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पदवी वितरण समारंभामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ३१३ पदविका, ७१५ पदव्या, २५८ पदव्युत्त पदव्या तर धुळे जिल्ह्यातील २४४ पदविका, ४४१७ पदव्या व १३२३ पदव्युत्तर पदव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक प्रा.डॉ. उमेश राजदेरकर असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिराणी साहित्तिक सुभाष अहिरे, जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, एसएसव्हीपीएस कॉलेज धुळे येथील प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य टी.ए.मोरे (नंदुरबार), नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने हे उपस्थित राहणार आहेत. एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्राचार्य के.जव्ही.पाटील, प्राचार्य एम. व्ही. पाटील, प्रा. अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Yashwantrao Chavan Maharashtra Open University Distribution Degree Ceremony at Nandurbar on 7th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.