लॉकडाउनच्या काळात शिथिलता येताच काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 22:33 IST2020-05-23T22:32:47+5:302020-05-23T22:33:11+5:30
हातावरच पोट । चपला शिवूनच चरितार्थ

लॉकडाउनच्या काळात शिथिलता येताच काम सुरु
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखत असताना देशपातळीवर लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले़ आता दीड महिन्यांच्या वरती काळ लोटल्यामुळे स्थानिक पातळीवर काही कामांना वेळेनुसार सूट देण्यात आली आहे़ त्या वेळेचा उपयोग करुन चपला बुट शिवून आपला चरितार्थ भागविणाऱ्यांनी काही कष्टाळूंनी आपलं बस्तान नेहमीच्या जागेवर मांडलं होतं़ त्याच्यातून दोन पैसे मिळतील आणि आपला चरितार्थ भागविला जाईल या विचाराने चपला बूट शिवणाºयांनी आपले बस्तान मांडले होते़ लॉकडाउन असल्यामुळे संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती़ या व्यतिरिक्त कोणालाही बाहेर फिरणाºयास मज्जाव करण्यात आला होता़ जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी जी काही वेळेची सूट होती तेवढीच़ आता काही व्यवसायांना वेळेची मर्यादा लक्षात घेऊन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे़