अल्पवयीन दोन मुलींसह एका महिलेले घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:00 PM2019-11-19T23:00:40+5:302019-11-19T23:01:00+5:30

धुळे बसस्थानक : अहमदाबाद येथून धुळे मार्गे पुण्याला जाण्याचा होता बेत

A woman was taken into custody along with two minor girls | अल्पवयीन दोन मुलींसह एका महिलेले घेतले ताब्यात

अल्पवयीन दोन मुलींसह एका महिलेले घेतले ताब्यात

Next

धुळे : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून महाराष्ट्रातील पुणे येथे अल्पवयीन दोन मुलींना घेऊन जाणाºया टोळीचा धुळे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ दोन मुलींसह त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ ही घटना धुळे येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, मुली हरविल्याची तक्रार अहमदाबाद येथील वाजळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ 
अहमदाबाद शहरातील दोन उच्चभू्र घरातील मुलींना दहाव्या इयत्तेत गुण कमी मिळाले़ त्यांचे पालक त्यांना रागविले होते़ त्याचा राग आल्याने त्या दोन्ही मुलींनी घरातून पळून जाण्याचे ठरविले़ घरातून पैसे घेऊन गोवा येथे पळून जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्या़ मुलींची विक्री करणाºया टोळीची नजर त्यांच्यावर पडली़ त्यानंतर १८ तारखेला रात्री तीन महिला त्या दोन्ही मुलींना रिक्षात बसवून बसस्थानकात घेऊन गेल्या़ याचे सीसीटीव्ही कॅमेराचे काही फुटेज अहमदाबाद येथील पोलिसांच्या हाती लागले आहेत़ त्यानंतर तीन पैकी दोन महिला सुरत येथे उतरल्या़ तपास करीत असतानाच अहमदाबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन्ही महिलांना ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी संशयित गिता भानुदास निकम (२३, रा़ खंडोबावाडी, ता़ राहुरी) हिच्यासोबत धुळे बसमध्ये बसविल्याचे सांगितले़ त्यानंतर ते पुणे येथे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना चौकशीवेळी दिली़ 
धुळे पोलीस सज्ज
सुरत येथून एक महिला दोन मुलींना घेऊन धुळ्याकडे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, कर्मचारी योगेश चव्हाण, तुषार मोरे, राहुल गिरी, रणजित वळवी, माया ढोले, वंदना वाघ, सुशीला वळवी यांनी शहर बसस्थानकाच्या आवारात सापळा लावला़ मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुणे येथे जाणाºया बसच्या समोर पोलिसांना दोन मुली आणि एक महिला संशयितरित्या फिरतांना आढळून आल्या़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवी-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली़ या मुली आणि महिला त्याच असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़ तोपर्यंत मुलींचेही पालक पोलीस ठाण्यात पोहचले होते़ 
अहमदाबादचे पोलीस येणार
याप्रकरणी तपासासाठी अहमदाबाद येथून पोलीस धुळ्यात येणार आहेत़ त्यानंतर या मुली आणि महिलेला सुरत येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ 
रॅकेट असण्याची शक्यता
मुलींची विक्री करुन पैसे कमविण्याचा त्यांचा हेतू असावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे़ सुरत येथील रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या दोन महिलांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे़ या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु झाला आहे़ मात्र, अहमदाबाद येथील पोलीस आल्यानंतरच बºयाच बाबींचा उलगडा होणार असल्याचे स्पष्ट आहे़ 

Web Title: A woman was taken into custody along with two minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.