शिरपुरात महिलेचा गळफासने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:02+5:302021-08-20T04:42:02+5:30
१७ रोजी संगीता किरण पाटील ही विवाहिता कुणाल सोसायटीत पती व एक ३ वर्षांच्या बालकासमवेत राहत होती. पती कामानिमित्त ...

शिरपुरात महिलेचा गळफासने मृत्यू
१७ रोजी संगीता किरण पाटील ही विवाहिता कुणाल सोसायटीत पती व एक ३ वर्षांच्या बालकासमवेत राहत होती. पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तीने घरातील दरवाजा आतून बंद करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या वेळी फक्त तिच्याजवळ ३ वर्षांचा बालक होता. घटनेनंतर काही वेळानंतर तो बालक जोरजोराने रडू लागला. बराच वेळ रडल्यामुळे घराजवळील व ये-जा करणाऱ्या रहिवाशांना बालक सारखा रडत असल्यामुळे ते त्या घराकडे गेले. तेव्हा घरातील दरवाजा आतून बंद असल्यामुळे काहींनी खिडकीतून पाहिले असता महिलेने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यामुळे लगेच दरवाजा तोडून तिला दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचा वॉर्डबॉय गणेश बैंडवाल याने दिलेल्या खबरीवरून शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नेमके मृत्यूचे कारण समजू शकले नाही़