रानमळ्यातील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:10 IST2019-04-07T13:10:01+5:302019-04-07T13:10:30+5:30
मोहाडी पोलीस : चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

रानमळ्यातील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील रानमळा येथील विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ जाचांस कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करत चार जणांविरुध्द संशयावरुन मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तालुक्यातील रानमळा येथील अजाब महादू मोरे यांची आजी पिताबाई मोरे यांना पाहण्यासाठी एकता राहुल ठाकरे (२०, रा़ रानमळा ता़ धुळे) ही आली होती़ याचा मनात राग धरुन तिला शिवीगाळ करण्यात आली़ हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ त्यामुळे जाचांस कंटाळून तिने किटक नाशक औषध प्राशन केले़ बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रानमळा गावातील आबा गावडे यांच्या शेतात घडली़ घटना लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना तिचा मृत्यू ओढवला़
जाचांस कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत अजाब महादू मोरे (३८, रा़ रानमळा ता़ धुळे) या ट्रक चालकाने शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, राहुल रामदास ठाकरे, रामबाई मोहन मालचे, अनिता रामदास ठाकरे, ललिता रामदास ठाकरे (रा़ रानमळा ता़ धुळे)या चौघांविरुध्द भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा घटनेचा तपास करीत आहेत़