रस्ता अडवून महिलेचा केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:20 IST2020-01-03T23:19:10+5:302020-01-03T23:20:17+5:30
संतोषी माता चौक : शहर पोलिसात गुन्हा

रस्ता अडवून महिलेचा केला विनयभंग
धुळे : शहरातील संतोषी माता चौकात महिलेचा दुचाकी गाडी अडवून तिचा हात धरत विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़
देवपुरातील नकाणे रोडवरील एका ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, संशयित रामा राजेंद्र जावडेकर (रा़ राजेंद्र नगर, मोगलाई, धुळे) याने हे कृत्य केले आहे़ या महिलेच्या मोबाईलवरील व्हॉटस्अप डीपीवर ठेवलेले फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करीत सोबत स्वत:चे फोटो लावून फोटो बनवले़ त्याच्या सहाय्याने ब्लॅकमेल करुन फिर्यादी महिलेकडे वेळोवेळी पैशांची मागणीही त्याने केली़ तसेच १ जानेवारी रोजी रात्री १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास ही महिला आपल्या बहिणीसोबत संतोषी माता चौकातून दुचाकीने जात होती़ त्यांची दुचाकी अडवून तिचा हात धरला आणि मनास लज्जा वाटेल असे विधान करत विनयभंग केला़ याशिवाय तिला दमदाटीही त्याने केली़
सततच्या जाचाला कंटाळून या महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली़ तिने संशयित रामा राजेंद्र जावडेकर याच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़ संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत़