भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Updated: October 21, 2023 15:59 IST2023-10-21T15:59:23+5:302023-10-21T15:59:26+5:30
साक्री तालुक्यातील सामोडे चौफुलीचरील घटना

भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
धुळे : भरधाव वेगात आलेल्या ट्रकची महिलेला धडक बसली. अपघाताची ही घटना साक्री तालुक्यातील सामोडे चौफुलीचर शुक्रवारी सकाळी घउली. उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला. हिराबाई सदाशिव सोनवणे (वय ६०, रा. सामोडे ता. साक्री) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
सामोडे येथील हिराबाई सोनवणे या शुक्रवारी सकाळी बाजार करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी चौफुलीवर त्यांना दहिवेलकडून सटाण्याकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यांच्या दाेन्ही पायावरुन ट्रकचे मागचे चाक गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या या घटनेनंतर हिराबाई यांना खासगी वाहनाने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेची प्रकृति गंभीर होती. उपचार सुरु असताना दुपारी हिराबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरेाधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.