वाळु माफियांविरुध्द कठोर भुमिका घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:47 IST2020-12-08T21:47:17+5:302020-12-08T21:47:46+5:30
जिल्हाधिकारी : पत्रकार भिका पाटील हल्ला प्रकरणी प्रशासनाला निवेदन, शिंदखेडा, साक्रीतही निषेध

dhule
धुळे : वाळू माफियांविरुध्द प्रशासन कठोर भुमिका घेत आहे. गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र पथक तयार केले असून वाळू माफियांशी लागेबांधे असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचाही शोध घेतला जाईल. पत्रकार भिका पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्हा प्रशासन पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी भुमिका जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मांडली.
लोकमतचे शिंदखेडा येथील पत्रकार भिका पाटील यांच्यावर सोमवारी रात्री वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. या घटनेचा पत्रकार सृष्टीसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी पत्रकार सुनील पाटील, धनंजय दिक्षित, राजेंद्र साेनार, दीपक वाघ, तुषार परदेशी, किशाेर पाटील, मनेष मासाेळे, दीपक बाेरसे, नागिंद माेरे, प्रशांत परदेशी, चंद्रकांत साेनार, अजिम शेख, रवींद्र नगराळे, अतुल जाेशी, सुनील बैसाणे, विजय डाेंगरे, शांताराम अहिरे, सुनील महाले,गोरख गर्दे, बापू वाफेकर, राजू कापडणीस, गाेपाल कापडणीस, राजेंद्र गुजराथी यांच्यासह विविध वृत्तपत्र, स्थानिक,राष्ट्रीय चॅनेलचे प्रतिनिधी,फाेटाेग्राफर उपस्थित हाेते.
शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळु चोरी होत असून वाळु माफियांचा बंदोबस्त करावा. पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करणारे निवदेन शिंदखेडा येथील पत्रकारांनी तहसिलदारांना दिले. यावेळी प्रा. दीपक माळी, प्रा. अजय बोरदे, विजयसिंह गिरासे, प्रा. जी. पी. शास्त्री, प्रा. सतिष पाटील, अशोक गिरनार, जितेंद्र मेखे, परेश शाह, योगेश बोरसे, धनराज निकम, चंद्रकांत माळी, मनोज गुरव, महेंद्र मराठे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, साक्री येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष आबा सोनवणे, जी. टी. मोहिते, जगदिश शिंदे, बाळकृष्ण तोरवणे, प्रा. लहू पवार, भानुदास गांगुर्डे, विलास देसले, शरद चव्हाण, रवींद्र देवरे, प्रकाश वाघ, संगपाल मोरे, सुर्यकांत बच्छाव, जितेंद्र जगदाळे, उमाकांत अहिरराव यांनी तहसिलदारांना निवेदन देवून हल्लेखाेरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच साक्री तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.