आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ, १०२० जागांसाठी अनेक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:47+5:302021-07-26T04:32:47+5:30

गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे वाढला ...

Will ITI get admission Ray Bhau, many applications for 1020 seats | आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ, १०२० जागांसाठी अनेक अर्ज

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ, १०२० जागांसाठी अनेक अर्ज

गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे वाढला असून, त्यामुळे आयटीआयसाठी स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एका ट्रेडसाठी अनेक अर्ज येत असल्याने, आता आयटीआयमध्येही गुणवत्तेवरच प्रवेश मिळू लागलाय. धुळे येथील शासकीय आयटीआयमध्ये २० ट्रेडच्या १,०२० जागा आहेत. यासाठी १५ जुलैपासनू ॲानलाईन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झालेला असून, अर्जांचा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले.

अर्ज स्थिती

एकूण जागा १,०२०

प्राप्त अर्ज- १,५३०

संस्था

शासकीय संस्था :०६

खासगी संस्था : १६

रिक्त जागा

शासकीय संस्था : ३०

खासगी संस्था : ५५

फिटर / इलेक्ट्रीशियनला पसंती

आयटीआयसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती फिटरला आहे. फिटरचा ट्रेड घेणाऱ्या विद्यार्थ्याला खासगी कंपनीत लवकर संधी मिळत असते. त्यामुळे फिटरला प्राधान्य दिले जात आहे.

तर काही विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रीशियन ट्रेड घेण्याकडे आहे. नोकरी मिळो अथवा न मिळो इलेक्ट्रीशियन्सला खासगी कामांच्या माध्यमातूनही रोजगार मिळत असल्याने, रोजगाराचे साधन म्हणून या ट्रेडकडे पाहिले जात आहे.

आयटीआयत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थिनींचाही कल वाढलेला असून, अनेक विद्यार्थिनी या ब्युटीपार्लर, तसेच शिवणकामाच्या ट्रेडला पसंती देत असल्याचे दिसून येते आहे.

यावर्षी दहावीत चांगले गुण मिळालेले असले तरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी आयटीआयची निवड केली आहे. यात टर्नर व फिटर या दोन ट्रेडला जास्त प्राधान्य दिलेले आहे. शासकीय संस्थेतूनच आयटीआय करणार आहे.

- भूषण देवरे,

विद्यार्थी

महाविद्यालयात पाच वर्षे शिक्षण घेण्यापेक्षा दोन वर्षात आयटीआयचा कोर्स करून लवकर नोकरी मिळावी, या उद्देशानेच आयटीआयला प्रवेश घेत आहे. यासाठी इलेक्ट्रिशियन या ट्रेडला प्राधान्य दिले आहे.

-संजय पाटील

विद्यार्थी

Web Title: Will ITI get admission Ray Bhau, many applications for 1020 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.