जिथे मी कमी पडतो तिथे ती मला खंबीर साथ देते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:39 IST2019-05-19T12:38:43+5:302019-05-19T12:39:27+5:30
कलेची किंमत फक्त एक रूपयाच असते

dhule
चंद्रकांत सोनार ।
देव जरी जगात नसला तरी देवासारखी माणसं जगात आहेत़ हे मी दुष्टीहीन असुन देखील अनुभवले आहे़ अंधशाळेत दहावीपर्यत शिक्षण घेतले़ सरकारकडून कोणतीही मदत नसतांना देखील बासरी वाजवुन कला प्रेमीच्या मदतीतुन संसार सुरू आहे़
प्रश्न : लग्न, नोकरी किंवा प्रेमविरहात आत्महत्या करणाºया तरूणांना आपन काय सांगाल?
उत्तर : संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त करता येवु शकत नाही़ नैराश्य, अपयश, पे्रमविरहात तरूण आत्महत्या करून जीवन संपवितात़ ना पैसा, ना म्हातारपणाची काठी, ना डोळ्यांची रोशनी नसतांना देखील आयुष्यात कधी खचलो नाही़ संघर्षातुन जीवन जगतो आहे़ आमच्यासारखे दु:ख कोणाच्याही वाट्याला निश्चित नसेल़ मग सर्व काही असतांनाही नैराश्यापोटी आत्महत्या करण्याची वेळच येवू नये़
नशीबी अंधत्व असतांनाही जीवन जगण्याची प्रेरणा कशी मिळाली ?
उत्तर : आयुष्य केवळ आमची परीक्षा घेण्यासाठी आहे़ म्हणुन संघर्ष करून जिद्द व चिकाटीने जीवन जगतो आहे़ लग्न करतांना मुलगा मुलीला पसंत करतो़ मात्र मला मुलीने पसंत केले़ कारण मी जन्मता दोन्ही डोळ्यांनी अंध आहे़ आयुष्यात पत्नींची व कलेची साथ मिळाली म्हणुन गुण्यागोविंदाने संसार सुरू आहे़
आयुष्याचा साथीदार निवडणाºया तरूणींना आपण काय सल्ला द्याल ?
उत्तर : गडगंज पैसा, पुणे, मुंबईत नोकरी, शेती असेल पण शेतात जाणार नाही़ या आधारावर मुली आयुष्याचा साथीदाराची निवड करतात़ बदलत्या काळानुसार तरूणींनी कुठेतरी तडजोड करण्याची गरज आहे़ प्रामाणिक, कष्टाळू तसेच संपत्ती कमविणाºयापेक्षा संपत्ती टिकविणाºया साथीदाराची निवड करावी़ तरच संसाराचा रथ आयुष्यभर चालु शकतो़
दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे?
उत्तर : आम्ही फक्त कला सादर करून उदरनिर्वाह भागवतो़ समाजाने देखील दयेच्या भावनेने पाहण्याची गरज आहे़
संसाररथाची दोन चाके असतात़ ती चाके म्हणजे पती आणि पत्नी़ जर एक चाक लडखडू लागले की दुसºयांने त्याला आधार द्यायचा असतो़ मात्र आमच्या संसाराची दोन्ही चाके जन्मापासुनच कमकुवत आहेत़ त्यामुळे जिथे मी कमी पडतो तिथे ती मला साथ देते़
ती जास्त चालु शकत नाही आणि मी पाहू शकत नाही
रोहिदास आणि गंगुबाई हे दिव्यांग दाम्पत्य आयु ष्याला घचुन न जाता़ बाररी वाजवुन संसाराचा गाढा चालवित आहे़ पती रोहिदास यांच्या डोळ्यातील ज्योती कायमच्या विझलेल्या आहेत़ तर पत्नी गंगुबाई या एका पायानी दिव्यांग आहे़ त्यामुळे त्या जास्त चाल शकत नाही़ बालपणापासुनच बासरी वाजविण्याचा छंद आता रोहिदास आणि गंगुबाई यांच्या संसारासह त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे. क्षणिक सुखासाठी, किरकोळ कारणावरून काडीमोड घेणाºया पती-पत्नींसाठी त्यांचा हा आदर्श संसार निश्चितपणे प्रेरणादायी ठरावा, असाच आहे.