रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:25+5:302021-09-25T04:39:25+5:30
सुरत-वाराणसी एक्स्प्रेस चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस उधना-अमरावती पॅसेंजर सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरत-भागलपूर एक्स्प्रेस मुंबईत सवलत, आम्हाला का नाही? कोरोनाचे ज्यांनी ...

रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?
सुरत-वाराणसी एक्स्प्रेस
चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
उधना-अमरावती पॅसेंजर
सुरत-भुसावळ पॅसेंजर
सुरत-भागलपूर एक्स्प्रेस
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?
कोरोनाचे ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांना मासिक रेल्वे पासही उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, दुसऱ्या स्थानकांवर ही सुविधा अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही.
भुर्दंड किती दिवस सहन करायचा?
नोकरीनिमित्त दररोज नंदुरबार येथे जावे लागते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून रेल्वे पास देत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- संजय पाटील
प्रवासी
रेल्वेचा प्रवास सर्वांनाच परवडणारा आहे. मासिक पास फायदेशीर आहे. मात्र, कोरोनामुळे अद्यापही पास मिळत नाही.
- दीपक वसावे
प्रवासी
रेल्वेचा मासिक पास मिळत नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. यात आर्थिक भुर्दंड बसत असून, मासिक पास पूर्ववत द्यावा.
- शांताराम गिरासे
प्रवासी
प्रवाशांना दिलासा देण्याची गरज
नोकरीनिमित्त दररोज अप-डाऊन करणाऱ्यांना खाजगी वाहनांनी प्रवास करणे अशक्य आहे. अगोदरच खाजगी कंपन्यांमध्ये पगार कमी आहे. त्यातच खाजगी वाहनांनी रोज भाडे देऊन प्रवास करायचा म्हणजे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेने मासिक पासची सुविधा पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.