वरिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:58+5:302021-02-05T08:46:58+5:30

दरम्यान, नोव्हेंबरपासून कोराेनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली. अशा परिस्थितीत शिक्षणही ...

When will the academic year of senior college begin? | वरिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केव्हा होणार?

वरिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केव्हा होणार?

दरम्यान, नोव्हेंबरपासून कोराेनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. हळूहळू जनजीवन सुरळीत होऊ लागले. सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली. अशा परिस्थितीत शिक्षणही सुरू होईल, अशी अपेक्षा होती. अपेक्षेनुसार ते झालेही. मात्र, ज्या पद्धतीने सुरू झाले, त्याबाबत पालकही संभ्रमात पडले.

वास्तविक, प्रथम पदवी, पदव्युत्तरपासून प्राथमिकपर्यंतचे शिक्षण सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाने शिक्षण सुरू करताना अजब तऱ्हा वापरलेली आहे. पहिले माध्यमिकचे नववी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू केले, नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. मात्र, पदवी, पदव्युत्तरचे वर्ग अजून सुरू करण्याचा मुहूर्त मिळालेला नाही.

सुदैवाने जिल्ह्यात पाचवी ते १२वीपर्यंतच्या एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. शाळा व शिक्षकांनी कोराेनाबाबतचे नियम पाळल्याने ॲाफलाइन शिक्षण पुन्हा सुरळीत सुरू झाले. जर प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग सुरळीत सुरू होऊ शकतात, तर पदवी-पदव्युत्तरपर्यंतचे का नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जरी ऑनलाइन शिक्षण मिळत असले, तरी त्याला मर्यादा आहेत. थेअरीचे शिक्षण ॲानलाइन मिळू शकते. मात्र, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स करावे लागतात. ते ॲानलाइन कसे शक्य होऊ शकणार, शिवाय आता परीक्षाही दोन-तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ लवकर करावा, अशी पालकांसह विद्यार्थ्यांचीही अपेक्षा आहे.

Web Title: When will the academic year of senior college begin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.