शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आॅगस्टमध्ये मार्गी लागल्यास स्वागतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 5:47 PM

आमदार अनिल गोटे यांची भुमिका, भूसंपादन प्रकरणात भाजप नेते सहभागी असल्याचा आरोप

ठळक मुद्दे- भूसंपादन प्रकरणाची होणार एसआयटी चौकशी- पांझराकाठच्या रस्त्यांचे काम पाईपलाईनमुळे लांबले-झोपडपट्टयांना सिटी सर्व्हे नंबर मिळविण्यासाठी प्रयत्नशिल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची निविदा प्रक्रिया आॅगस्टमध्ये झाल्यास स्वागतच आहे़ परंतु आॅगस्टची नवीन फेकमफाक एक्सप्रेस ठरायला नको, असे म्हणत आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरेंवर टिका केली़  त्याचप्रमाणे जमिन संपादन प्रकरणात भाजपच्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप आमदार गोटे यांनी केला़आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते म्हणाले की, रेल्वेमार्गाची प्रक्रिया राबविण्यासाठी कालावधी लागतो़ तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा, अटी शर्ती अशी मोठी प्रक्रिया असते़ परंतु आॅगस्टमध्ये जर हे सर्व पूर्ण होऊन काम सुरू होणार असेल तर स्वागतच आहे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे श्रेय या रेल्वेमार्गासाठी ज्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, त्यांचे असल्याचेही गोटे म्हणाले़ भाजपच्याच मंत्र्यांनी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाबाबत गेल्या २० वर्षात काहीच कार्यवाही झाली नसल्याचे सांगून तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अवमान केला आहे, असे आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ त्याचप्रमाणे पांझराकाठच्या रस्त्यांलगत जलवाहिनीच्या कामाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याने काम लांबले असून पावसामुळे डांबरीकरण थांबविले असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले़ जेलरोडच्या संदर्भातील फाईल अर्थखात्याकडे असून ती महिनाभरात मार्गी लागेल़ शहरातील झोपडपट्टयांना सिटी सर्व्हे क्रमांक मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत असल्याचेही आमदार गोटे म्हणाले़  

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे