निजामपुरात जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:00+5:302021-08-20T04:42:00+5:30
यावेळी बोलताना डॅा.पवार म्हणाल्या, ‘‘देशाचे नेतृत्व सक्षम आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लस निर्मितीसाठी ३५०० कोटीचे बजेट दिले ...

निजामपुरात जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत
यावेळी बोलताना डॅा.पवार म्हणाल्या,
‘‘देशाचे नेतृत्व सक्षम आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लस निर्मितीसाठी ३५०० कोटीचे बजेट दिले आणि भारतात लस निर्मिती झाली.आता आरोग्य सुविधा कमी पडू नये म्हणून २३ हजार कोटी चे पकेज दिलेआहे.आपण सुद्धा धुळे जिल्ह्याकडेअडचणी दूर करण्यासाठी लक्ष देणार आहोत असे सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि. प. सदस्य हर्षवर्धन दहिते, पिंपळनेर मंडळ भाजप अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, साक्री मंडळ भाजप अध्यक्ष वेडू सोनवणे, शैलेंद्र आजगे, निजामपूर भाजप अध्यक्ष महेंद्र वाणी, पं. स. सदस्य सतीश राणे, सविता पगारे, दीपाली जगदाळे, लीलाताई सूर्यवंशी, लक्ष्मीकांत शाह, अजितचंद्र शाह, माजी पं. स. सदस्य वासुदेव बदामे, संजय खैरनार, ईश्वर न्याहाळदे, दशरथ शेलार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमादरम्यान जैताणेचा प्रसिद्ध लोकर कांबळा डॉ. पवार यांना माजी सरपंच ईश्वर न्याहाळदे यांनी भेट दिला, तर लक्ष्मीकांत शाह यांनी सपत्नीक येथील दैवत म्हसाईमाता मंदिराची फोटो प्रतिमा भेट दिली. दीपाली जगदाळे यांनी शिवचरित्र पुस्तक भेट म्हणून दिले. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.