लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटेपर्यंत तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी २५१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६ हजारावर पोहोचली.मृतांमध्ये, धुळे शहरातील देवपूर, मोहाडी उपनगर, धुळे तालुक्यातील देवभाने व सोनगीर, शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे, शिरपूर तालुक्यातील वाठोडा व साक्री येथील रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ७४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ११, साक्री तालुक्यातील ५४, शिरपूर तालुक्यातील ४० व शिंदखेडा तालुक्यातील ७२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६ हजार २०३ इतकी झाली आहे.
बुधवारी २५१ अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्ण संख्या पोहोचली सहा हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 21:10 IST