मास्क लावून जपताहेत स्वत:चे आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:05 IST2020-07-19T21:05:01+5:302020-07-19T21:05:46+5:30
कोरोना बंदोबस्त : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची दक्षता

dhule
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस देखील आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहेत़ सुरुवातीपासून मास्क लावून पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे दिसून येत आहे़ तसे आदेशच पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ वर्दळीच्या चौकात ही स्थिती प्रामुख्याने पहावयास मिळत आहे़
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली़ त्या अनुषंगाने काही नियमावली लागू करण्यात आली़ त्यात अनावश्यक बाहेर न फिरणे, काही कामांनिमित्त बाहेर फिरण्याची वेळ आल्यास मास्कचा उपयोग करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम लादण्यात आला होता़ हा नियम आजही कार्यान्वित आहे़ या सर्वांमध्ये सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका महत्वाची आहे़ रस्त्यावर उभे राहून स्वत:चा जिव धोक्यात टाकून त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजाविले आहे़ प्रत्येक पोलिसाने मास्कचा उपयोग करावा, सॅनिटायझर लावावे असे आदेश पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पारीत केले होते़ यासंदर्भात त्यांच्याकडून वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आलेला आहे़ बंदोबस्तावर असलेले पोलीस आजही मास्कचा प्राधान्याने उपयोग करीत असल्याचे चित्र स्पष्ट आहे़