शस्त्र परवान्याची झाली फॅशन, जिल्ह्यात पाचशे परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:23+5:302021-07-07T04:44:23+5:30

शस्त्र सांभाळणे कठीण परवाना असलेले शस्त्र सांभाळणे कठीण असते. त्यामुळे सांभाळणे मोठी जबाबदारीच असते. जुन्या शस्त्रांमध्ये लॉक करण्याची सोय ...

Weapons licenses went fashion, five hundred licenses in the district | शस्त्र परवान्याची झाली फॅशन, जिल्ह्यात पाचशे परवाने

शस्त्र परवान्याची झाली फॅशन, जिल्ह्यात पाचशे परवाने

शस्त्र सांभाळणे कठीण

परवाना असलेले शस्त्र सांभाळणे कठीण असते. त्यामुळे सांभाळणे मोठी जबाबदारीच असते. जुन्या शस्त्रांमध्ये लॉक करण्याची सोय नसते. त्यामुळे या शस्त्रांमधून अनवधानाने गोळी सुटू शकते. त्यासोबतच रिव्हाॅल्व्हर आणि मॅग्झिन असलेले पिस्तूल यांची काळजी घ्यावी लागते. मॅग्झिन असलेल्या पिस्तुलांमध्ये गोळी कधीही लॉक होऊ शकते. मात्र, आता नव्याने आलेल्या पिस्तूलला लॉकिंगची सोय असते. त्यात लॉक उघडल्यावर आणि ट्रिगर दाबल्यावरच गोळी सुटते. त्यामुळे खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

शस्त्र परवाना कसा काढायचा

शस्त्र परवाना काढण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावे लागते. त्यासाठी आधी शस्त्र हाताळण्याच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाते, तसेच शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा आहे का? हे देखील अर्जात दाखल करावे लागते. त्यासोबतच ज्याच्या नावाने शस्त्र परवाना घ्यायचा आहे. त्याची शारीरिक तंदुरुस्तीदेखील सिद्ध करावी लागते. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासोबतच ओळखपत्र, फोटो पुरावा, जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे सादर करावी लागतात.

शस्त्रांचा वाढला वापर

जिल्ह्यात काही महिन्यांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरुद्धही पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. रात्रीच्या सुमारास शस्त्र हातात घेऊन फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विनापरवानगी शस्त्रे येतात कुठून? हे शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा नेमका उद्देश काय, याविषयी कसून तपासणी करण्याची गरज आहे.

Web Title: Weapons licenses went fashion, five hundred licenses in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.