दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:47 IST2021-02-25T04:47:10+5:302021-02-25T04:47:10+5:30
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दत्त मंदिर चाैक, कमलाबाई शाळा, कराचीवाला खुंट, संतोषी माता चाैक, पारोळारोड अशा ...

दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दत्त मंदिर चाैक, कमलाबाई शाळा, कराचीवाला खुंट, संतोषी माता चाैक, पारोळारोड अशा विविध मुख्य चाैक काही दिवसांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले आहे. दोन दिवसांपासून येथील सिग्नल सुरू करण्यात आल्याने पोलिसांचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. बुधवारी शहरातील संतोषी माता चाैक व कमलाबाई शाळेजवळील सिग्नल चाैकात जाऊन पाहणी केली असता. काही चालकांकडून सिग्नल नियमांचे पालन करण्यात येत होते. तर काही व्यक्ती सिग्नल पाहून निघून जात होते. आतातरी धुळेकरांनी सिग्नल नियमांचे पालन करावे अन्यथा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सिग्नल किंवा वाहतूक पोलिसांची कारवाई
कारवाईपेक्षा प्रत्येकाने वाहन चालविताना शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आपले दुर्लक्ष दुसऱ्यांसाठी जीवघेणे ठरू शकते. शहरातील केवळ महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था केलेली आहे. सिग्नल व्यवस्थेसाेबत अवैध पार्किंगची समस्या सोडविल्यास वाहनचालकांना अडचणी येणार नाहीत.
-कुंदन पाटील,
वाहनचालक
वाहतूक पोलिसांकडून केवळ वाहनचालकांवरच कारवाई करून चालणार नाही. तर प्रत्येकाला वाहतुकीची शिस्त कशी लागेल याकडे लक्ष दिले पाहिजे. पार्किंग समस्या, रस्त्यावरील अतिक्रमण सोडविण्याची गरज आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून वाहतुकीची शिस्त लावण्याची अपेक्षा आहे.
धीरज जाधव
वाहनचालक