धुळे मनपातर्फे उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:35 PM2017-12-17T17:35:10+5:302017-12-17T17:38:56+5:30

नळजोडणी नसलेल्या मालमत्तांना ठरावानुसार ५०० रूपये आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप

Water taxation charges, if not sanctioned by Dhule munprop | धुळे मनपातर्फे उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणी

धुळे मनपातर्फे उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणी

Next
ठळक मुद्देनळजोडणी नसलेल्या मालमत्ताधारकांना सरसकट ५०० रूपये पाणीपट्टी आकारली जाते़महासभेत २२ एप्रिल २०१० ला त्याबाबतचा ठराव़उपविधी मंजूर नसतांना पाणीपट्टी आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप़

धुळे : शहरात मनपाच्या दफ्तरी असलेल्या नोंदीनुसार सुमारे ७० हजार मालमत्ताधारक आहेत़ तर ३८ हजार नळधारक आहेत़ मात्र ज्या मालमत्ता धारकांकडे नळकनेक्शन नाही, त्यांना मनपाकडून ५०० रूपये पाणीपट्टी आकारणी केली जाते़ परंतु उपविधी मंजूर नसतांना होत असलेल्या या आकारणीवर लेखापरीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आला आहे़
 शहरात पिण्याच्या पाण्याचा आणि नियोजनाचा प्रश्न जटील आहे. जीर्ण जलवाहिन्यांना सतत गळती लागत असल्याने देखभालदुरूस्तीचा खर्च वाढत आहे़ दरम्यान, शहरात सद्यस्थितीत ७० हजार मालमत्ताधारक असले तरी त्या तुलनेत अधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या केवळ ३८ हजार इतकी आहे़ मात्र ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही ते देखील मनपा हद्दीत राहत असून मनपाचेच पाणी वापरतात़ त्यामुळे अशा मालमत्तांना सरसकट ५०० रूपये पाणीपट्टी आकारण्याचा ठराव मनपाच्या २२ एप्रिल २०१० च्या महासभेत करण्यात आला होता़  सदर ठरावाची अंमलबजावणी देखील होत आहे़ मात्र महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ नुसार महापालिका आर्थिक उत्पन्नाचे व्यवस्थापन करण्यासाठी ऐच्छिक कर आकारू शकते मात्र असे कर आकारतांना करप्रकार व दर यांचा उपविधी करून शासनाकडून मंजूरी प्राप्त करणे आवश्यक आहे़ शासनाची मंजूरी मिळाल्यानंतरच कर रक्कम वसुल करता येईल, असे नियमात म्हटले आहे़ तथापि धुळे महापालिकेने उपरोक्त नियम व स्थायी निदेशानुसार उपविधी मंजूर करून न घेता नळजोडणी नसलेल्या मालमत्ताधारकांकडून ५०० रूपये पाणीपट्टीची आकारणी करून अनियमितता केल्याचा ठपका नुकत्याच झालेल्या मनपाच्या २०१२-१३ च्या लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे़ अजूनही ५०० रूपये आकारणी होत आहे़

Web Title: Water taxation charges, if not sanctioned by Dhule munprop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.