लाटीपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:33+5:302021-05-15T04:34:33+5:30
निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस ...

लाटीपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडावे
निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील तीनही प्रकल्प १०० टक्के भरून वाहात होते. त्यामुळे शेतकरीही सुखावला होता. म्हणून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत कुठलीही पाणीटंचाई जाणवली नाही. जे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आवर्तन सोडावे लागते, त्याची फारशी गरज भासली नाही. पांझरा नदी पात्रातदेखील मार्च महिन्यापर्यंत ओलावा होता. आता मात्र मे महिन्यात पांझरा नदीकाठावरील सुमारे १४ गावांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सर्वच गावांच्या पाणीपुरवठा विहिरी या पांझरा नदी किनारी असल्यामुळे पांझरा नदीतून सुमारे १०० दलघफू एवढे आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, जेणेकरून ग्रामस्थांना पाणी टंचाई जाणवणार नाही. लाटीपाडा धरणात सुमारे ५०० दलघफू पाणी साठा आजपर्यंत शिल्लक आहे. या साठ्यातून काटदान परिसरात दरवर्षी पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडावे. यामुळे उजव्या कालव्यावरील दिघावे, छाईल, प्रतापपूर, नाडसे, दारखेल, निळगव्हाण, बेहेड, विटाई या सर्वच गावांचा पाणी प्रश्न संपेल. लाटीपाडा धरणातून शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यातून पांझरा नदीपात्रात १०० दलघफू व उजव्या कालव्यातून १००० दलघफू एवढे पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागास सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, धुळे व तहसीलदार, साकी