शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 5, 2017 12:42 IST

उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे.

ऑनलाई लोकमत/सुनील सांळुखे

शिरपूर, जि.धुळे, दि.4- उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर  तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असली तरी  शिरपूर शहरासाठी आरक्षित असलेल्या करवंद धरणात समाधानकारक पाणी साठा असल्याने शहरवासियांना 24 तास शुद्ध पाणी सोडण्यात येत आहे. 
शिरपूर तालुक्यात 2 मध्यम प्रकल्पासह 11 लघू प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतार्पयत दीडशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आह़े   
गेल्या पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु,  काही बंधारे कमी-अधिक पावसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधा:यात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर आटले. गेल्या वर्षी  नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच  धरणे व बंधारे कोरडठाक पडली आहेत. 
आदिवासी पाडय़ात भीषण टंचाई
 उन्हाची तीव्रता वाढत असताना आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आह़े आदिवासी पाडय़ांवर तर 2-4 किमीर्पयत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत  आह़े काही पाडय़ांवर तर मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  
टंचाई असतानाही टॅँकर सुरू नाही
तालुक्यात पाण्याची टंचाई असतानाही अद्याप  एकही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू नाही. अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर  आह़े त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आह़े संभाव्य पाणीटंचाई होवू शकते म्हणून प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आह़े  
करवंद धरणामुळे शहरातील नागरिकांना दिलासा 
करवंद व अनेर  प्रकल्पात ब:यापैकी पाणी साठा आह़े पैकी करवंद धरणाचे सुमारे 100 दशलक्ष घन फूट पाणी शहरासाठी आरक्षित आह़े हे पाणी साधारणत: जुलै अखेर्पयत पुरू शकणार असल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. तर अनेर धरणात 50 टक्के पाणी असून येत्या मे-जूनमध्ये कापसाची लागवड करणा:या शेतक:यांच्या पिकांसाठी हे पाणी पुरविले जाणार आह़े त्यामुळे सध्या दोन्ही धरणातील पाटचारीच्या माध्यमाने सोडण्यात येणारे पाणी बंद केले आह़े आजमितीस अनेर धरणात 50 टक्के तर करवंद धरणात 26.50 टक्के पाणीसाठा आह़े 
 
धरणांमधील पाणी साठा असा : 
 
धरण क्षमता साठा दशघमी टक्के
करवंद       18.26   4.87 26.50 
अनेर 49.27 25.47 50
बुडकी 1.73 0.24 5
वकवाड         2.67 0.15 2
बुडकी 1.73 निरंक---
वाडी          1.34 निरंक---
जळोद 2.11 निरंक---
विखरण          1.90 निरंक---
कालीकराड  1.99  निरंक---
रोहिणी          0.96 निरंक---
नांदर्डे 3.60 निरंक---
गधडदेव          1.53 निरंक---
मिटगांव            1.02 निरंक---