शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:01 IST

पाटबंधारे विभाग : एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट नदीपात्रात; पांझरा काठच्या गावांना दिलासा

ठळक मुद्देअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयादरम्यान, अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील १० अशा एकूण १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजता पाटबंधारे विभागातर्फे  पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद  ३५० क्युसेस या वेगाने एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी दिली. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची झळ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना सहन करावी लागत आहे. त्यात गेल्यावर्षी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात समाधानकारक जलसाठा होता. त्यामुळे या धरणातून पाणी कधी सुटणार? याकडे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून  होते. 

जिल्हाधिकाºयांनी दिले होते पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश  अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांना सोमवारीच आदेश दिले होते. त्यात म्हटले होते, की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे.   त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे मुळी प्र. डांगरी व निमकपिलेश्वर गावापर्यंत जाणवणाºया टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले होते. तीन दिवसात धुळ्यात येणार पाणी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याप्रसंगी बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ओ. पवार, शाखा अभियंता बी. व्ही. जिरे, जे. डी. खैरनार, भाजपा नेते रामकृष्ण खलाणे, न्याहळोदच्या सरपंच ज्योती भिल, गटनेते विकास पवार, उपसरपंच प्रताप माळी, नेरचे सरपंच शंकर खलाणे, कैलास रोकडे व ज्ञानेश्वर रोकडे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुढील तीन दिवसात धुळ्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

९ क्रमांकाच्या दरवाजातून सुटले पाणी अक्कलपाडा धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. एकूण दरवाजांपैकी ९ व्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पुढील १२ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मुडावद या गावापर्यंत पोहचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.